Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कॉलेजची ही नावं वाचाल तर पोट धरून हसाल, माहीत आहेत का शॉर्ट फॉर्म्स?

10

Funny Names of Education Institutes: आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात आपली शाळा आणि कॉलेज महत्त्वाची भूमिका बजावतात. आपले भविष्य घडवण्यात या संस्थांचा आपल्या आयुष्यात मोलाचा वाट असतो. त्यामुळे चांगल्या शाळा-कॉलेजांमधून आपल्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून पालकांची धडपड पाहायला मिळते. कॉलेजचे नाव, त्याच रँकिंग या बाबी यात महत्त्वाच्या भूमिका बजावतात. मात्र देशात काही अशा संस्था आहेत ज्यांची आव वाचून तुम्हाला हास आवरणार नाही.

१. तामिळनाडू अ‍ॅडव्हान्स्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (Tatti) :

नाही-नाही, आम्हाला कोणत्याही संस्थेची किंवा त्याच्या नावाची चेष्टा करायची नाही. परंतु भारताच्या तामिळनाडू राज्यातील एका संस्थेचे हे नाव आहे. तामिळनाडू अ‍ॅडव्हान्स्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (Tamilnadu Advanced Technical Training Institute (TATTI) असे या संस्थेचे सुरु नाव असून याचे इंग्रजी भाषेतील संक्षिप्त स्वरूपातील नाव ‘तट्टी’ असे होते. या संस्थेच्या वेबसाईटमध्येही संस्थेच्या नावाचे संक्षिप्त स्वरूप वापरण्यात आले असून https://www.tatti.in/ अशी त्यांची अधिकृत वेबसाईट आहे. विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देणारी ही एक नामांकित संस्था आहे. या संस्थेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार १९८५ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
वेबसाइट : https://www.tatti.in/

(वाचा : Globetrotter Aditi: शाळेची ‘दांडीगुल’ न करता चिमुकलीने केलीय ५० देशांची सफर, १० व्या वर्षी मिळवलाय खास मान)

२. पोट्टी श्रीरामुलु कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी (PSCMR) :

आंध्रप्रदेशाच्या विजयवाडा येथील या कॉलेजच्या विस्तृत नावामधील इंग्रजीतील स्पेलिंगमुळे या संस्थेचे नाव चर्चेत आहे. Potti Sriramulu College of Engineering & Technology यातील Potti या शब्दावरून कॉलेजची खिल्ली उडवली जात असली तरी, या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी सर्वतोपरी प्रयत्न करतात. पद्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रमांमधील अनके विषयही या संस्थेत शिकवले जातात.
वेबसाइट : https://pscmr.ac.in/

फोटो सौजन्य : PSCMR वेबसाइट

३. घंटा आयआयटी फिजिक्स (Ghanta IIT Physics)

आता हि माहिती आणि संस्थेचे हे नाव कितपत खार आहे कि नाही याबद्दल सत्यता उपलब्ध नाही. परंतु हा फोटो गेले अनेक दिवस सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत . या संस्थेबाबत तुम्हाला सोशल मीडियावर अनेक पोस्ट दिसतील. मात्र, या संस्थेशी निगडित कोणतीही अधिकृत वेबसाइट सापडली नाही. आता ती खरी आहे की खोटी हे सांगता येत नाही, मात्र ही पोस्ट सोशल मीडियावर अनेकदा शेअर करण्यात आली.

फोटो सौजन्य : ट्विटर (सुखदीप सिंग (@s4sukhdeep) ७ जानेवारी २०१६)

४. टेक्नोक्रॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (TITS) :

मध्यप्रदेश राज्यातील टेक्नोक्रॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स ही संस्था त्या संस्थेच्या संक्षिप्त स्पेलिंगमुळे चर्चेत आहे. एमटेक, बीटेक, एमसीए, बी. फार्म, एम. फार्म, पॅरामेडिकल, नर्सिंग, लॉ या आशा असे अनेक अभ्यासक्रम या संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. शिवाय, या संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी देशातल्या अनेक विद्यार्थ्यंनाची चढाओढ पाहायला मिळते.
वेबसाइट : https://technocratsgroup.edu.in/

फोटो सौजन्य : TITS वेबसाइट

(वाचा : Career In ISRO: ‘चांद्रयान ३’चे यशस्वी उड्डाण केलेल्या इस्रोमध्ये करिअर करणे आहे सोपे, निवडा हे कोर्स)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.