Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

5000mAh ची दमदार बॅटरी, ६.७ इंचाचा सुपर डिस्प्ले, किंमतही १० हजारांपेक्षा कमी, Realme C51 लाँच

12

नवी दिल्ली : Realme C51 Features : रिअलमी कंपनीने आणखी एक दमदार असा बजेट फोन आणला असून Realme C51 हा C-Series चा नवीन बजेट स्मार्टफोन सध्या तैवानमध्ये लाँच केला गेला आहे. Realme C51 हा कंपनीचा नवीन फोन आहे आणि तो 5000mAh अशा दमदार बॅटरीसह येतो. Realme C51 मध्ये ५० मेगापिक्सेल प्रायमरी रेअर कॅमेरा ६.७ इंचाचा डिस्प्ले यांसारखे दमदार फीचर्स आहेत. नवीन Realme स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे.

Realme C51 किंमत आणि उपलब्धता
Realme C51 चा 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंट तैवानमध्ये 3,990 TWD म्हणजेच भारतातील सुमारे १०,४०० रुपये इतक्या किंमतीला लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन कार्बन ब्लॅक आणि मिंट ग्रीन रंगात येतो. हा हँडसेट Realme तैवानच्या अधिकृत स्टोअरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. Realme ने अजून इतर बाजारात हा हँडसेट लाँच करण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. लवकरच Realme C51 भारतात लाँच होऊ शकतो. टिपस्टर पारस गुगलानी (@passionategeekz) यांनी दावा केल्याप्रमाणे हा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाईल.

Realme C51 चे फीचर्स
Realme C51 स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा HD (720 x 1600) डिस्प्ले आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 90 Hz आहे आणि टच सॅम्पलिंग रेट 180 Hz आहे. स्क्रीन पीक ब्राइटनेस 560 nits आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T612 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. हँडसेटमध्ये रॅम वाढवण्याची टेक्नोलॉजी देखील आहे, ज्याद्वारे हँडसेटमध्ये व्हर्च्युअल रॅम 4 जीबीपर्यंत वाढवता येते. Realme C51 स्मार्टफोन Android 13 सह येतो. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर फोनमध्ये डुअल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. स्मार्टफोनमध्ये एपर्चर F/1.8 सह 50-मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सरसह आणखी एक लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे, ज्यामध्ये अपर्चर F/2.0 आहे. या Realme स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय Realme C51 मध्ये 3.5mm हेडफोन जॅक, फिंगरप्रिंट स्कॅनर आणि ड्युअल सिम सपोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हँडसेटचे वजन 186 ग्रॅम आणि 167.2 x 76.7 x 7.99 मिमी आहे.

वाचा : तुम्हीही Spotify वापरता? आता गाणी ऐकणं होणार महाग, पाहा कसा आहे नवीन प्लान?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.