Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

iPhone Sale in India : भारतात आयफोनची विक्री तुफान वाढली, जर्मनी, फ्रान्सलाही टाकलं मागे

9

नवी दिल्ली : Apple Sale in India : एकेकाळी फारच निवडक लोकांकडे आयफोन होता. पण आता आयफोन वापरणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. यामुळेच भारतात अ‍ॅपल आयफोनची विक्री सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अ‍ॅपल कंपनीकडून भारतातही मोठी गुंतवणूक केली जात आहे. त्यामुळे भविष्यात भारतात आयफोनच्या विक्रीत आणि उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. रिसर्च फर्म काउंटरपॉईंटच्या अहवालानुसार, यंदाच्या आर्थिक वर्षाच्या जूनच्या शेवटच्या तिमाहीत भारत अ‍ॅपलची पाचवी सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. या बाबतीत भारत जर्मनी आणि फ्रान्सला मागे टाकून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. अमेरिका, चीन, जपान आणि ब्रिटन हे देश फक्त भारताच्या पुढे आहेत.

या अहवालानुसार, २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत भारतात आयफोनच्या विक्रीत आणखी वाढ होऊ शकते. आयफोन सेलमध्ये वर्षभरात ५० टक्के वाढ नोंदवली जात आहे. यामध्ये भारताचा वाटा सातत्याने वाढत आहे. गेल्या वर्षीपर्यंत आयफोन विक्रीत भारताचा वाटा ३.४ टक्के होता, तो वाढून ५.१ टक्के झाला आहे. अ‍ॅपलच्या उत्पादनांची विक्री वाढवण्याच्या उद्देशाने अ‍ॅपलची नवीन दुकाने उघडली जात आहेत. अलीकडेच दिल्ली आणि मुंबईत नवीन अ‍ॅपल स्टोअर्स उघडण्यात आले आहेत. काउंटर पॉइंटचे संशोधन विश्लेषक मॉर्गन स्टॅनली यांच्या मते, अ‍ॅपलला येत्या ५ वर्षांत भारतातून सर्वाधिक महसूल मिळू शकतो. ५ वर्षांनंतर, अ‍ॅपलच्या एकूण महसुलात भारताचा सुमारे १५ टक्के हिस्सा असेल.

टाटा भारतात आयफोन बनवणार
Apple ने भारतात आयफोनचे उत्पादन २०२३ मध्ये ७ टक्क्यांवरून २०२५ मध्ये १८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे. तसेच भारतीय कंपनी टाटा भारतात आयफोन बनवण्याच्या योजनेवर काम करत आहे.

वाचा : iPhone 15 च्या लाँचिंगला उशीर होणार? डिस्प्लेच्या प्रॉब्लेममुळे कंपनीची वाढली डोकेदुखी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.