Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सदर पदांच्या भरतीची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने पार पडणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज जमा करावा लागणार आहे. या भरतीमधील विविध पदांसाठी नियुक्ती थेट मुलाखतीद्वारे होणार असून, निवड होणाऱ्या उमेदवाराला आवश्यक त्या कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
(वाचा : GATE 2024: गेट २०२४ साठी अर्ज नोंदणीला सुरुवात होणार, कुठे आणि कसे करायचे अॅप्लिकेशन जाणून घ्या)
पद भरतीचा तपशील :
एकूण रिक्त जागा : १६
० जीवशास्त्रज्ञ (Biologist) : १ जागा
० पशुवैयकिय अधिकारी (Veterinary Officer) : १ जागा
० निसर्ग पर्यटन व्यवस्थापक (Ecotourism Manager) : २ जागा
० सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक (Assistant Ecotourism Manger) : २ जागा
० उपजीविका तज्ज्ञ (Livelihood Expert) : २ जागा
० सर्वेक्षण सहाय्यक (Survey Assistant) : १ जागा
० जीआयएस तज्ज्ञ (GIS Expert) : १ जागा
० ग्राफिक डिझायनर (Graphic Designer) : १ जागा
० स्थापत्य अभियंता (Civil Engineering) : १ जागा
० जलद बचाव गट सदस्य (Member of Rescue Relief Unit): ४ जागा
पदासाठी शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता :
वरील प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता, अतिरिक्त पात्रता आणि पदनिहाय मानधन वेगवेगळे असून पेंचप्रकल्प व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर केलेल्या परिपत्रकात याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
नोकरीचे ठिकाण : नागपूर
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
- वरील कोणत्याही पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी भाषेचे (वाचन, लिहिणे, बोलणे) ज्ञान असणे अत्यावश्यक आहे.
- वर नमूद केलेल्या मुख्यालयाव्यतिरिक्त निवड झालेल्या उमेदवारास कार्यकारी संचालक, पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर यांच्या आदेशानुसार त्यांच्या कार्यक्षेत्रात इतर कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल.
- पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर पदभरती पदांकरता बायोडेटा, अर्ज आणि आवश्यक कागदपत्र मुलाखतीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
- अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही इतर शासकीय, निमशासकीय, किंवा कोणत्ययी शासकीय संस्थेचा पदाधिकारी नसावा.
- सदर पद ही पूर्णवेळ असल्याने या काळात उमेदवाराला इतर ठिकाणी काम करता येणार नाही.
- नियुक्ती झालेल्या जलद बचाव गट सदस्याला २४ तास सेवेकरिता तत्पर राहणे बंधनकारक राहील.
- वरील कोणत्याही पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे : अर्ज पाठवण्याचा पत्ता आणि भरातीविषयी इतर आवश्यक माहिती परिपत्रकात देण्यात आली आहे. शिवाय, ५ ऑगस्ट २०२३ रोजी होणाऱ्या मुलाखतीविषयी पूर्वसूचना अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.
(वाचा : MEA Internship: देशाच्या परराष्ट्र मंत्रालयात इंटर्नशिप करायची आहे..? मग हे नक्की वाचा)