Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Samsung Galaxy Watch 6 फायनली लाँच, जबरदस्त हेल्थ फीचर्ससह बरच काही

9

नवी दिल्ली : Samsung Galaxy Watch 6 Series : सॅमसंगने या आठवड्यात आपल्या एका खास कार्यक्रमात एकापेक्षा एक दमदार प्रोडक्ट्स लाँच केले असून यावेळी नवीन स्मार्टवॉच सीरिज देखील लाँच केली आहे. Galaxy Watch 6 आणि Watch 6 Classic या स्मार्टवॉचेस बाजारात आल्या आहेत. यामध्ये तुम्हाला रोटेटिंग बेझल हे खास फीचर मिळणार आहे जे आधीच्या स्मार्टवॉचमध्ये दिसले नव्हते. विशेष बाब म्हणजे कंपनीने आपल्या बॅटरीवर देखील खूप काम केले आहे आणि त्यामुळे तुम्हाला दमदार बॅटरी बॅकअप देखील मिळणार आहे.

हेल्थ मॉनिटर टूल्स Galaxy Watch6 आणि Galaxy Watch6 Classic मध्ये उपलब्ध आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की यूजर्सच्या आरोग्याच्या दृष्टीने हे फिटनेस मोड जोडण्यात आले आहेत. यामध्ये तुम्हाला स्लीप मोड देखील मिळणार आहेत. म्हणजेच दिवसाव्यतिरिक्त, हे घड्याळ वापरकर्त्यांसाठी रात्री देखील फारच कामाचे असेल. हे युजर्सच्या झोपेच्या सवयी सुधारण्यात मदत करेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

हेल्थ फीचर्सवर खास लक्ष
आजकाल स्मार्टवॉचेस या हेल्थ रिलेटेड फीचर्ससाठी ओळखल्या जातात. दरम्यान सॅमसंगची ही नवीन स्मार्ट वॉच मालिका पूर्णपणे वापरकर्त्यांच्या फिटनेसला लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. यात स्केलेटल मसल, बेसल मेटाबॉलिक रेट, शरीरातील पाणी आणि शरीरातील चरबी टक्केवारीपर्यंत सर्व डेटा तपासला जातो. वापरकर्त्यांचा फिटनेस चांगला ठेवण्यासाठी सॅमसंगने खास कां केलं आहे. वॉचमधील हार्ट रेट झोन वैशिष्ट्याच्या मदतीने एखाद्याची शारीरिक क्षमता तपासता येते आणि पाच वेगवेगळ्या रनिंग लेव्हल्स देखील यामध्ये उपलब्ध असतील.

वर्क आऊट ट्रॅकर्सही उपलब्ध

तुम्हाला या वॉच सिरीजमध्ये वेगवेगळे वर्कआउट ट्रॅकर्स देखील मिळतात. ट्रॅक रन रेकॉर्ड करण्यासाठी हे फीचर्स देण्यात आले आहेत. या वर्कआउट्स फीचर्सच्या मदतीने, वापरकर्ते वर्कआउट रूटीन तयार करुन पर्सनलाईज ट्रेनिंग घेऊ शकतात. यामध्ये ब्लड प्रेशर आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राम मॉनिटर देखील मिळणार आहे, जो हृदयाचे ठोके तपासण्यास सक्षम असेल. या घड्याळाचा डिस्प्ले मागील सीरिजच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. Galaxy Watch 6 ला 44mm आणि 40mm असे दोन पर्याय मिळणार आहेत. तर वॉच 6 क्लासिकमध्ये 43mm आणि 47mm चे दोन प्रकार उपलब्ध आहेत.

वाचा : Virat Kohli Earbuds : कोहली वापरतो ‘या’ कंपनीचे इअरबड्स, किंमत आहे २० हजार, वाचा सविस्तर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.