Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कृषी क्षेत्रात प्रगती करण्यासाठी जाणून घ्या उत्तम दर्जाचे शिक्षण कुठे मिळेल

13

Career in Agriculture After 12th: भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशातील विकासात या क्षेत्राचा वाटा मोठा आहे. दिवसागणिक कृषी क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून कृषी क्षेत्राला अधिक प्रगत बनवण्याचा पर्यटन केला जात आहे. देशातील जवळजवळ सत्तर टक्के लोकसंख्या शेतीवर आधारित आहे. नव्या पद्धतीने शेतीचा विकास आणि संशोधन होण्यासाठी देशातील अनेक कृषी विद्यापीठे कार्यरत असतात.

कृषी विज्ञान यासारख्या नव्या संकल्पना उदयास येत असताना त्यामध्ये रोजगाराच्या अनेक संधी आता उपलब्ध होत आहेत. शेती हा व्यवसाय म्हणून उत्तम पद्धतीने केल्यास त्यामध्ये करिअर करता येते. कृषी उद्योगासाठी प्रशिक्षित तरुणांची गरज आता मोठ्या प्रमाणात भासत आहे. देशात ७० कृषी विद्यापीठ कार्यरत आहेत. या सर्व संस्थामधून उत्तम दर्जाचे विद्यार्थी शिक्षण घेउन बाहेर पडत आहेत. परदेशातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन, संशोधन आदी शाखांमध्ये कार्य होत आहे. इतर शाखांप्रमाणे याही क्षेत्रात करिअर करता येवू शकते

आधुनिकीकरणाच्या या युगातही अनेक विद्यार्थी कृषी क्षेत्राकडे वळत आहेत. भविष्यात शेती आणि आधुनिक शेती तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवीन संधी उपलब्ध असतात. हल्ली कृषी विषयातील अनेक अभ्यासक्रम टॉप ट्रेंडमध्ये आहेत. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून तरुणांना शेतीशी संबंधित उत्तम माहिती मिळणार आहे. ज्याच्या जोरावर तरुणांना नवीन क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळणार आहे. या क्षेत्रात तरुणांना लाखो नोकऱ्या सहज मिळू शकतात. याविषयी जाणून घेऊया…

(वाचा : IITB BSc Engineering: आयआयटी मुंबईच्या बीटेक कोर्सच्या तिसऱ्या वर्षी बाहेर पडल्यानंतर मिळणार बीएससीची पदवी)

या करिअरमधून होईल लाखोंची कमाई :

वैज्ञानिक शेतीमुळे देशातील शेतकरी स्वावलंबी होत आहेत. आधुनिक पद्धतीची शेती उत्पादनात वाढ करत असतानाच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठीही प्रभावी ठरत आहे. त्यामुळेच आता शेतकरी आपल्या शेतातील मातीची चाचणी करून खतांचे प्रमाण ठरवू शकतात. शिवाय, शेती-आधुनिक शेती, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, वनीकरण, फलोत्पादन, अन्न आणि गृहविज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांचा अभ्यास करून विद्यार्थी त्यांचे भविष्य घडवू शकतात. सोबतच, कृषी क्षेत्रात मार्केटिंग आणि मॅनेजमेंट क्षेत्रातही अप्रतिम करिअर करता येते.

कृषी क्षेत्रात करिअर करण्यासाठी आहेत अभ्यासक्रम :

1. कृषी भौतिकशास्त्र
2. शेती व्यवसाय
3. वनस्पती पॅथॉलॉजी
4. वनस्पती प्रजनन आणि आनुवंशिकी
5. वृक्षारोपण व्यवस्थापन
6. कृषी अभियांत्रिकी
7. कृषी क्षेत्रात मार्केटिंग आणि मॅनेजमेंट

(वाचा : MEA Internship: देशाच्या परराष्ट्र मंत्रालयात इंटर्नशिप करायची आहे..? मग हे नक्की वाचा)

पात्रता आणि प्रवेश प्रक्रिया :

या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कृषी शास्त्रज्ञ होण्यासाठी B.E. किंवा कृषी पदविका करणे आवश्यक आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांकडे संबंधित विषयात स्पेशलायझेशन असावे.

कृषी शिक्षण हे दोन स्तरावर दिले जाते :

  • कृषी उच्च शिक्षण यात पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवीपर्यंत शिक्षण महाविद्यालयातून दिले जाते.
  • कृषी निम्नशिक्षण पदविका ही कृषी विद्यालयातून दिले जाते. राज्यातील कृषी विषयातील उपलब्ध अभ्यासक्रम कृषी, उद्यानविद्या, कृषि अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, कृषि व्यवसाय व्यवस्थापन, गृह विज्ञान, मत्स्य विज्ञान, वनिकी, पशुसंवर्धन हे होत.

कृषी क्षेत्रात नोकरीच्या संधी :

देशातील तरुणांना दरवर्षी ICAR (भारतीय कृषी संशोधन परिषद) मध्ये नोकरीची संधी मिळते. UPSC मार्फत कृषी तज्ञांच्या नियुक्तीसाठी परीक्षा देखील घेतली जाते. अनेक खासगी कंपन्या कृषी पदवीधरांना नोकऱ्याही देतात. हे पदवीधर शेतकर्‍यांना बँकेतील किसान क्रेडिट कार्ड, कर्ज आदी (Agriculture Courses After 12th) कामात मदत करू शकतात. बँकेच्या फिल्ड ऑफिसरच्या नोकरीसाठी कृषी क्षेत्रातील अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाते.

या संस्थांमध्ये प्रवेशाला अधिक मागणी :

1. भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली
2. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था
3. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था
4. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ
5. अलाहाबाद कृषी संस्था
6. जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ
7. भारतीय कृषी संशोधन संस्था

(वाचा : Career In ISRO: ‘चांद्रयान ३’चे यशस्वी उड्डाण केलेल्या इस्रोमध्ये करिअर करणे आहे सोपे, निवडा हे कोर्स)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.