Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मेगाभरती!

15

महापालिकेच्या वैद्यकीय विभागात काम करू इच्छिणाऱ्यासाठी एक मोठी संधी कल्याण-डोंबिवली महापालिकेत उपलब्ध झाली आहे. सध्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रुग्णालयात डॉक्टर्सची कमतरता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिकेने हे भरती जाहीर केली आहे.

महापालिका क्षेत्रातील कल्याण येथील रुक्मिणी बाई रुग्णालय आणि डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर रुग्णालयात सध्या डॉक्टर्सची संख्या कमी असल्याने पालिकेच्या रुग्णसेवेत अडचण येत आहे. त्यामुळे रुग्णांची सेवा अविरत करता यावी यासाठी महापालिकेने पॉली क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत तज्ज्ञ डॉक्टर्सच्या भरतीची जाहिरात पालिकेने जाहीर केली आहे. एकूण ५६ जागांसाठी ही भरती असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे. इच्छुक उमेदवार ४ ऑगस्ट, सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज भरू शकतात.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे ‘पॉली क्लिनिक’ ही नवी संकल्पना राबवण्यात येत आहे. नागरी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ही सेवा देण्यात येणार असून कल्याण, डोंबिवली येथील दत्त नगर, खडेगोळवली, गौरीपाडा, ठाकुर्ली, आंबिवली, तीसगाव, मढवी, महाराष्ट्र नगर येथे हे पॉली क्लिनिक सुरू करण्यात येणार आहेत.
(वाचा: Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य क्रिडा व युवक सेवा संचालनालयात महाभरती.. असा भराल अर्ज.. )

‘या’ डॉक्टरांसाठी भरती:

स्त्री रोग तज्ञ – Gynecologist
नेत्र रोग तज्ञ – Ophthalmologist
बाल रोग तज्ञ – Pediatrician
त्वचा रोग तज्ञ -Dermatologist
कान – नाक – घसा रोग तज्ञ – Ear, Nose and Throat Specialist
मानसोपचार तज्ञ – Psychiatrist
जनरल प्रॅक्टिस डॉक्टर – General Physician

असा भराल अर्ज:

महापालिकेच्या संकेत स्थळावर (link) उपलब्ध असलेला अर्ज भरून तो पालिकेच्या मेल आयडीवर तसेच प्रत्यक्ष येऊन महापालिकेच्या कार्यालयात येऊन दाखल करणे अनिवार्य आहे. तसेच मुलाखतीस उमेदवाराने प्रत्यक्ष उपस्थित राहणे गरजेचे असून येताना पालिकेने नमूद केलेली सर्व कागदपत्रे आणणे आवश्यक आहे.
अर्ज दाखल करण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, कंडोमपा, शंकरराव चौक, कल्याण (प.), ४२१३०१
अर्ज दाखल करण्यासाठी मेल आयडी – kdmcpaneldr@gmail.com
अर्ज पाहण्यासाठी “या” लिंकवर क्लिक करा.

आवश्यक कागदपत्रे:

दहावी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, सनद , एमएससीआयटी प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेनुसार इतर प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र , महाराष्ट्र स्टेट मेडिकल कौन्सिल नोंदणी किंवा नूतनीकरण प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड , जन्मतारखेचा दाखला.

वेतन:

या भरती प्रक्रियेतून नियुक्त डॉक्टरांना प्रतिदिनी २००० रुपये आणि प्रत्येक रुग्णामागे १०० रुपये देण्यात येणार आहेत. तसेच रुग्ण अधिक असल्यास त्या संपूर्ण दिवसाचे जास्तीत जास्त ५००० रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे. प्रतिदिनी ५००० ही वेतनाची सर्वोच्च रक्कम असेल.

(वाचा: UGC: देशातील सर्व महाविद्यालयांवर अंकुश ठेवणारे ‘यूजीसी’ नेमके आहे तरी काय?)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.