Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Instagram Tips : इन्स्टाग्रामवर एकदम क्लिअर व्हिडीओ कसा अपलोड करायचा? लाईक्सचा पडेल पाऊस

10

नवी दिल्ली : How to Upload Higher Quality Video on Instagram : आजच्या काळात प्रत्येकजण इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मशी जोडला गेला आहे. म्हणजेच अनेकजण स्वत:चे फोटो, आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करतात. तर अनेकजण दुसऱ्यांच्या फोटोवर लाईक कमेंट करुन आपला वेळ कसा न कसा या सोशल मीडिया प्लाटफॉर्मवर असतात. अनेकदा खूप मेहनत करूनही तुमच्या फोटोला आणि रीलला जास्त व्ह्यूज येत नाहीत, खरं तर चांगल्या व्हि्वूजसाठी इन्स्टाग्रामवर व्हिडिओच्या गुणवत्तेची काळजी घ्यावी लागते. तुम्ही इन्स्टाग्रामवर व्हिडिओ सेटिंगचा पर्याय सेट न केल्यास, अपलोड केल्यानंतर व्हिडिओची गुणवत्ता खराब होऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ उच्च सेटिंग मोडमध्ये पोस्ट केला पाहिजे. उच्च सेटिंग मोडमध्ये इंटरनेट गुणवत्ता देखील चांगली असणं गरजेचं आहे.
तर इन्स्टाग्रामवर अगदी दमदार क्वॉलीटीमध्ये व्हिडिओ कसा पोस्ट करायचा, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चलातर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ…
वाचा :Online Scam : जास्त पैसे कमावण्याच्या नादात बसला लाखोंचा गंडा, एक क्लिक आणि खात्यातून ९.३५ लाख गायब

उच्च दर्जाचे इन्स्टा व्हिडिओ कसे पोस्ट करावे?

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इन्स्टाग्राम अॅप ओपन करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला इन्स्टाग्रामच्या सेटिंग ऑप्शनवर जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला सेटिंग्ज आणि प्रायव्हसी विभागातील डेटा वापर आणि मीडिया गुणवत्ता या पर्यायाला भेट द्यावी लागेल.
  • येथे जर डेटा सेव्हरचा पर्याय चालू असेल तर तुम्हाला हा पर्याय बंद करावा लागेल.
  • यानंतर हाय क्वॉलिटी पर्याय एनाबेलला दे.
  • यानंतर, जेव्हा तुम्ही इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट कराल तेव्हा व्हिडिओ उच्च गुणवत्तेत पोस्ट केला जाईल.

टीप – जर तुम्हाला इनस्टाग्राम व्हिडिओचे पिक्सेल उच्च दर्जाचे हवे असतील तर तुम्हाला इंटरनेटच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे लागेल. कमी इंटरनेट गुणवत्तेवर व्हिडिओ पोस्ट केल्याने अधिक डेटा खर्च होतो. तसेच, व्हिडिओची गुणवत्ता देखील चांगली असावी.

वाचा : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आली जवळ, ‘या’ स्टेप्स फॉलो करुन ऑनलाइन भरा, नाहीतर दंड भरावा लागेल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.