Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Honor Pad X9 टॅब्लेट भारतात लाँच, कमी किंमतीत मिळणार दमदार फीचर्स

10

नवी दिल्ली : Honor Pad X9 टॅबलेट अधिकृतपणे भारतात लाँच झाला आहे. या मिड-बजेट टॅब्लेटमध्ये एकापेक्षा एक दमदार फीचर्स असून याची किंमत ही अगदी परवडणारी म्हणजेच १४,४९९ रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे या टॅबलेटमध्ये आवाजासाठी हाय क्वॉलिटी आउटपुट आणि फास्ट काम होण्यासाठी पावरफुल चिपसेट आहे. या टॅब्लेटची शिपिंग २ ऑगस्टपासून सुरू होईल. चलातर याबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

Honor Pad X9 ची किंमत आणि उपलब्धता
Honor Pad X9 टॅबलेट सिंगल ग्रे कलर वेरिएंटमध्ये येतो. या टॅबलेटची किंमत १४,४९९ रुपये आहे. हा टॅबलेट प्री-ऑर्डरवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. टॅबलेटला मोफत फ्लिप कव्हर आणि प्री-ऑर्डरवर ५०० रुपयांची अतिरिक्त सवलत दिली जात आहे. टॅब्लेटची शिपिंग २ ऑगस्टपासून सुरू होईल.

Honor Pad X9 चे फीचर्स
Honor Pad X9 टॅबलेटला 11.5 इंचाचा LCD TFT पॅनल देण्यात आला आहे, जो 2K रिझोल्यूशन सपोर्टसह येतो. टॅबलेटमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. टॅबलेटमध्ये स्नॅपड्रॅगन 685 चिपसेट वापरण्यात आला आहे. टॅबलेट Android 13 आधारित सपोर्टसह येतो. टॅबलेट 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. तसेच 3GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट देण्यात आला आहे.

कॅमेरा आणि बॅटरी
टॅब्लेटमध्ये 6 स्पीकर आहेत. तसंच मागील बाजूस 5MP कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच 5MP सेल्फी कॅमेरा आहे. यात 7250mAh बॅटरी आहे, ज्याला 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हा टॅबलेट ऑल-मेटल इंटिग्रेटेड बॉडीमध्ये येतो. टॅब्लेटची जाडी ६.९ मिमी आहे.

वाचा : एक नाही दोन डिस्प्ले, लेनोवोचा खास Lenovo Yoga book 9i भारतात लाँच

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.