Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Redmi Watch 3 Active आणि Xiaomi Smart TV X भारतात लाँच, किंमतींपासून फीचर्स सर्वकाही एका क्लिकवर

9

नवी दिल्ली : Redmi Watch 3 Active and Xiaomi Smart TV X Launch : रेडमी कंपनीने Redmi Watch 3 Active आणि Xiaomi Smart TV X सीरीज भारतीय बाजारात नुकत्याच लाँच केल्या आहेत. यातील वॉचबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. यात अनेक आरोग्य फीचर्ससह ८ दिवसांपर्यंतची बॅटरी लाइफ देण्यात आली आहे. हे Android 6.0 किंवा iOS 12 वर चालणाऱ्या फोनशी कनेक्ट करता येईल. तसंच स्मार्ट टीव्हीबद्दल सांगायचं तर, या मालिकेत ६५ इंचापर्यंतचा साईजमध्ये टीव्ही असणार असून चलातर या दोन्हीबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

Redmi Watch 3 Active ची किंमत
या स्मार्टवॉचची किंमत २,९९९ रुपये आहे. हे प्लॅटिनम ग्रे आणि चारकोल ब्लॅक रंगात खरेदी केले जाऊ शकते. यासोबतच ऑलिव्ह ग्रीन स्ट्रॅपही दिला जाऊ शकतो, जो ४९९ रुपये अधिक देऊन विकत घेता येईल. याची विक्री ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हे Mi.com आणि Xiaomi रिटेल स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकते.

Redmi Watch 3 Active चे फीचर्स
यात १.८३ इंच LCD डिस्प्ले आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन 240×280 आहे. यात ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी आहे. हे ब्लूटूथ कॉलिंग कनेक्टिव्हिटीसह येते. यात इनबिल्ट मायक्रोफोन आणि लाऊडस्पीकर देण्यात आला आहे. Mi Fitness अ‍ॅपद्वारे १० कॉन्टॅक्ट सेव्ह केले जाऊ शकतात. यात १०० हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि ब्लड ऑक्सिजन लेव्हल सेन्सर आहे. यामध्ये हृदयाच्या गतीवर लक्ष ठेवता येते. यामध्ये 200 हून अधिक वॉच फेस देण्यात आले आहेत. यात 289mAh ची बॅटरी आहे. कंपनीने दावा केला आहे की त्याची बॅटरी 12 दिवसांपर्यंत चालते. जड वापरात बॅटरी 8 दिवस टिकू शकते. यामध्ये मॅग्नेटिक चार्जर सपोर्ट देण्यात आला आहे. हे घड्याळ 5ATM पाणी प्रतिरोधक आहे.

Xiaomi स्मार्ट टीव्ही X सिरीजची किंमत:
Xiaomi Smart TV X सीरीजच्या ४३ इंच टीव्हीची किंमत २६,९९९ रुपये आहे. तसंच ५० इंच वेरिएंटची किंमत ३२,९९९ रुपये आहे. त्याच्या ५५ इंच वेरिएंटची किंमत ३७,४९९ रुपये आहे. तसंच ६५ इंच व्हेरिएंटची किंमत ५८,९९९ रुपये आहे. यांची विक्री ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
Xiaomi स्मार्ट टीव्ही X चे फीचर्स काय आहेत?
Xiaomi Smart TV X सिरीजमध्ये ४३ इंच, ५० इंच, ५५ इंच आणि ६५ इंच स्क्रीन असलेले टीव्ही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यांचे डिस्प्ले रिझोल्यूशन 3840×2160 आहे. यामध्ये डॉल्बी व्हिजन सपोर्ट उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात व्हिव्हिड पिक्चर इंजिनची सुविधा आहे. हा क्वाड-कोर चिपसेट देण्यात आला आहे. हे Google TV OS वर काम करते. हे 30W आउटपुटसह येते. हे डॉल्बी आणि डीटीएस सपोर्टसह येते. यात ड्युअल-बँड वाय-फाय, दोन यूएसबी-ए पोर्ट आणि तीन एचडीएमआय पोर्ट आहेत.
वाचा : Instagram Tips : इन्स्टाग्रामवर एकदम क्लिअर व्हिडीओ कसा अपलोड करायचा? लाईक्सचा पडेल पाऊस

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.