Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आता, याची अंमलबजावणी करत आयआयटी-मद्रासच्या झांझिबार कॅम्पसमधील विविध अभ्यासक्रमांसाठीचे अर्ज मागण्यास सुरुवात झाली आहे. ग्लोबल कॅम्पसमधील हे यावर्षीचे पहिले शैक्षणिक वर्ष असून, येथे उपलब्ध असणाऱ्या विविध अभ्यासक्रम आणि प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती आयआयटी-मद्रास, (झांझिबार कॅम्पस) च्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यावर्षीच्या म्हणजेच, २०२३ ऑक्टोबरपासून शैक्षणीक वर्षाचा श्रीगणेशा होणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांना ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुभा आहे.
(वाचा : IIT Admission: आयआयटी कॅम्पस आता अबू धाबीमध्ये; युएईमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी)
सध्या IIT-मद्रास झांझिबार कँपसमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक पात्रतेनुसार BS in Data Science and AI (डेटा सायन्स आणि AI) मध्ये MTech in Data Science and AI चार वर्षांची बॅचलर ऑफ सायन्स पदवी किंवा डेटा सायन्स आणि AI मध्ये दोन वर्षांची मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी पदवीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
भारतासासह जगभरातील वियार्थ्यांना या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करता येणार आहेत. आयआयटी-मद्रास, ‘ग्लोबल कँपस’ झांझिबार कॅम्पसमधील उपलब्ध या अभ्यासक्रमबरोबर विद्यार्थ्याना विविध गोष्टींचा अनुभवही मिळणार आहे. यासाठी, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासादरम्यान अनेक मनोरंजक संधी उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये युके आणि ऑस्ट्रेलियामधील IIT-M च्या भागीदार संस्थांसह परदेशात अभ्यास/सेमिस्टर एक्सचेंज प्रोग्राम, इतर देशांसह, विविध संबंधित कंपन्यांसह इंटर्नशिप आणि अभ्यासक्रमाच्या काही आवश्यकता पूर्ण करण्याची संधी यांचा समावेश करण्यात आला आहे.
आयआयटी-मद्रास, झांझिबार कॅम्पस, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड सायन्सच्या डीन आणि प्रभारी संचालक, प्रीती अघालयम यांच्या टाइम्स ऑफ इंडियामधील प्रतिक्रियेनुसार, यंदाच्या निवड प्रक्रियेमध्ये स्क्रीनिंग टेस्टचा समावेश असेल. विद्यार्थ्यांची शैक्षणीक पात्रता तपासण्याच्या उद्देशाने गणित, विज्ञान, इंग्रजी आणि विश्लेषणात्मक विषयांचा समावेश या चाचणीमध्ये करण्यात आला आहे. शिवाय, निवड प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये मुलाखतीच्या फेरीचे आयोजनही करण्यात येणार आहे.
जे विद्यार्थी गेल्या तीन वर्षांत बारावी, फॉर्म VI किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत ते BS प्रोग्रामसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत तर कोणत्याही अभियांत्रिकी/विज्ञान शाखेतील चार वर्षांची UG पदवी असलेले विद्यार्थी एम टेक प्रोग्रामसाठी अर्ज करू शकणार आहेत.
आयआयटी मद्रास, झांझिबार कॅम्पसमधील प्रवेशाची फी, राहण्याचा खर्च, विविध आर्थिक मदतीच्या आणि शिष्यवृत्तीच्या संधी आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात इतर माहितीसाठी त्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
(वाचा : IIT Admission: परदेशातील पहिला आयआयटी कॅम्पस; शिक्षण मंत्रालयाकडून झाला रीतसर करार)