Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चित्रपट दिग्दर्शक व्हायचय? मग ‘या’ गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील..

13

अवघ्या जगाला भुरळ पडलेले क्षेत्र म्हणजे चित्रपट सृष्टी. इथे प्रत्येकाला वाटत असते की आपणही या चंदेरी दुनियेचा भाग व्हावे. किंबहुना लाखो लोक या क्षेत्रात आपले नशीब आजमावत असतात. पण संधी क्वचितच कुणाला मिळते, कारण प्रत्येकजण अभिनय करण्यासाठी धडपडत असतो. पण याच क्षेत्रात दिग्दर्शन हा असा पर्याय आहे, ज्यामध्ये आपल्याला करियर करण्यास खूप वाव आहे. किंवा अनेकांना दिग्दर्शक व्हायचेही असते पण ते कसे, त्यासाठी काय करावे हे माहीत नसते. त्यामुळे तुमच्यात जर त्या क्षमता असतील आणि चित्रपट दिग्दर्शन करायचे तुमचे स्वप्न असेल तर पाहूया, तिथपर्यंत पोहोचायचे कसे?

चित्रपट दिग्दर्शक व्हायचे असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सृजनशील असणे गरजेचे आहे, एखादी गोष्ट वाचताना त्याचे दृश्य स्वरूप आपल्यापुढे उभे राहायला हवे. आपल्या प्रतिभेने एखादी कल्पना रंगवता येण्याची क्षमता हवी. त्यातले तंत्रशिक्षण घेण्याआधी ही या क्षेत्राची मूलभूत गरज आहे. त्यानंतर येतात ते फिल्म मेकिंगचे कोर्स ज्यातून तंत्रज्ञान, कॅमेरा यांचे ज्ञान मिळते. दिग्दर्शनातल्या तांत्रिक गोष्टी कळत जातात.

तसे करायचे नसेल तर तुम्ही थेट एखाद्या दिग्दर्शकाकडे शिकण्याच्या भावनेतून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून जावू शकता, त्यातूनही दिग्दर्शन शिकता येईल. एकदा त्यातले तंत्र अवगत झाले आणि तुमची स्वतःची शैली निर्माण झाली की अनेक ठिकाणी प्रोडक्शन हाऊस मध्ये मालिका, चित्रपट दिग्दर्शनाची संधी मिळत जाते. पण या क्षेत्राचे शिक्षण घेऊन जर आपण कामाला सुरुवात केली तर निश्चितचे त्याचे फायदे अनेक आहेत. कारण तिथे अनेक तज्ज्ञ मंडळी शिकवायला येत असल्याने आपण अधिक समृद्ध होत जातो. शिवाय तिथे प्रात्यक्षिक करण्याची संधी दिली जात असल्याने दिग्दर्शनाचा अनुभवही मिळतो.

चित्रपट दिग्दर्शनाचे कुठे डिप्लोमा कोर्सेस तर कुठे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या कोर्सेस मध्ये चित्रपट घडवण्याचा संपूर्ण प्रवास विद्यार्थ्यांना शिकवला जातो. त्यासाठी आधी पदवीपर्यंतचे शिक्षण घेणे गरजेचे आहे. शिवाय अशा कोर्सेस पूर्वी बऱ्याच महाविद्यालयांमध्ये पूर्वपरीक्षा घेतली जाते. ज्यामध्ये दिग्दर्शक होण्याची पात्रता एका परीक्षेद्वारे तपासली जाते.

(वाचा: मातृभाषेला कमी लेखू नका, ‘मराठी’ भाषेतही आहेत करियरच्या ‘या’ खास संधी..)

पाहूया हे कोर्सेस नेमके कोणते?

• सर्टिफिकेट कोर्स इन फिल्म डायरेक्शन (Certificate Course in Film Direction)
• डिप्लोमा इन फिल्म एंड टीव्ही डायरेक्शन (Diploma in Film and TV Direction)
• मास कम्युनिकेशन (Mass Communication)
• पीजी डिप्लोमा इन फिल्म डायरेक्शन (PG Diploma in Film Direction)
• बीएससी इन सिनेमा (B.Sc in Cinema)
• मास कम्युनिकेशन अँड फिल्म प्रोडक्शन कोर्स (Mass Communication and Film Production Course)
• डिप्लोमा इन फ़िल्म प्रॉडक्शन अँड डायरेक्शन (Diploma in Film Production and Direction)
• पीजी डिप्लोमा इन फिल्म अँड टीवी डायरेक्शन बीएससी इन फिल्म मेकिंग (PG Diploma in Film & TV Direction B.Sc in Film Making)

चित्रपट दिग्दर्शनाचे धडे देणारी महाराष्ट्रातील ही काही महाविद्यालये…

• फिल्म एंड टेलीविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया, पुणे (Film and Television Institute of India, Pune)
• व्हिस्टलिंग वुड्स इंटरनेशनल, मुंबई (Whistling Woods International, Mumbai)
• झी इंस्टीट्यूट ऑफ मीडिया आर्ट्स, मुंबई (Zee Institute of Media Arts, Mumbai)
• आईसीई इंस्टीट्यूट, मुंबई (ICE Institute, Mumbai)
• डिजिटल फ़िल्म एकेडमी, मुंबई (Digital Film Academy, Mumbai)
• मुंबई फिल्म इंस्टीट्यूट, मुम्बई (Mumbai Film Institute, Mumbai)
• रमेश सिप्पी अकॅडेमी ऑफ सिनेमा ऑफ एंटरटेनमेंट (Ramesh Sippy Academy of Cinema and Entertainment, Mumbai)
• एफएक्स स्कूल (FX School, Mumbai)

(वाचा: Career opportunities in commerce: कॉमर्स घेतलंय? मग तुमच्यासाठी ‘या’ आहेत करिअर आणि नोकरीच्या खास संधी..)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.