Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार, “आयआयटी मुंबई येथील संशोधन व विकास (Research & Development) सुविधांचा वापर करण्याच्या उद्देश्याने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. तंत्रशिक्षण संस्थांमधील अध्यापन, अध्ययन, संशोधन विकास व विस्तार या बाबींसाठी जागतिक दर्जाच्या आयआयटी, मुंबई या संस्थेचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच संस्थामधील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासही यानिमित्ताने मदत होणार आहे.”
(वाचा : World’s Top 10 Entrance Exams: जगातील टॉप १० प्रवेश परीक्षा, ज्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असणे गरजेचेच…)
या सामंजस्य करारावर तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर आणि आयआयटी मुंबईच्यावतीने डॉ. मिलिंद अत्रे (तंत्रशिक्षण संचालक, संशोधन आणि विकास) यांनी स्वाक्षरी केली आहे. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, डॉ. सचिन पटवर्धन, डॉ. अनिल नांदगांवकर, डॉ. मिलिंद अत्रे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या आहेत सामंजस्य करारातील ठळक बाबी
विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय :
- तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील १५ शासकीय व अनुदानित संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करुन देणे.
- आयआयटी मुंबई येथील पायाभूत सुविधा म्हणजेच प्रयोगशाळा आणि ग्रंथालय (Lab/Library) इत्यादींचा वापर करून उद्योजकता विकासासाठी मार्गदर्शन करणे.
- तज्ज्ञांद्वारे विविध व्याख्यानांचे आयोजन करणे, संशोधन व विकास (Research & Development) सुविधांचा वापर करणे अशा विद्यार्थी केंद्रित बाबींचा या सामंजस्य करारात समावेश करण्यात आला आहे.
प्राध्यापकांसाठी महत्त्वाचे निर्णय :
- आयआयटी मुंबई यांच्या विद्यमान धोरणांनुसार शासकीय व अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमधील शिक्षकवर्गासाठी व्यावसायिक प्रशिक्षण, कार्यशाळा, आयआयटी येथील प्रगत प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे, यांचा वापर करणे.
- संशोधन व विकास कामांमध्ये मदत
- राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या विविध योजनेंतर्गत निधी सहाय्यासाठी संशोधन आणि विकास प्रस्ताव तयार करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रस्तावाची छाननी करणे.
(वाचा : Google Job Opportunity: गुगलमध्ये नोकरी मिळवायची आहे, मग या टॉप प्लेसमेंट टिप्स खास तुमच्यासाठी…)