Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये बोगस डॉक्टरांचा जीवाशी खेळ.
- कोणतीही पदवी वा प्रशिक्षण नसताना करत होते उपचार.
- गोवंडी, शिवाजीनगरमधून पाच बोगस डॉक्टरांना अटक.
वाचा: पिंपरी चिंचवड लाच प्रकरण: भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षाला २ दिवसांची कोठडी
गोवंडी, शिवाजीनगर मधील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन बोगस डॉक्टरांनी व्यवसाय थाटला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक हणमंतराव ननावरे आणि सहायक फौजदार नितीन सावंत यांना मिळाली. प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईसाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली. पालिकेच्या एम पूर्व विभाग कार्यालयातील सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया कोळी यांची देखील यासाठी मदत घेण्यात आली. पोलीस आणि डॉक्टरांच्या पथकाने एकाच वेळी पाच क्लिनिकमध्ये छापा टाकला. बेसावध असलेल्या बोगस डॉक्टरांकडे पदवी तसेच इतर प्रमाणपत्रांबाबत विचारणा करण्यात आली. त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली तसेच त्यांनी दाखविलेली प्रमाणपत्रं दुसऱ्यांच्या नावावर तसेच काही बोगस असल्याचे निदर्शनास येताच डॉक्टरांना अटक करण्यात आली.
वाचा:ठाकरे सरकारचा नारायण राणेंना दणका; जन आशीर्वाद यात्रेवर मोठी कारवाई
या क्लिनिकवर कारवाई
पोलीस आणि पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी क्षमा, अलिशा, आसिफा, रेहमत आणि मिश्रा क्लिनिक अशा पाच क्लिनिकवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी स्टेथेस्कोप, वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शन्स, सर्जिकल ट्रे, सलाइन बाटल्या, अनेक प्रकारच्या गोळ्या तसेच बरेच वैद्यकीय साहित्य हस्तगत केले. या पाच डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वाचा: करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत CM ठाकरेंचा गंभीर इशारा; भाजपला सुनावले