Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

इंडियन पोस्टमध्ये GDS पदासह विविध जागांसाठी भरतीची घोषणा; परीक्षेशिवाय होणार निवड प्रक्रिया

12

India Post GDS Recruitment 2023: भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवकाच्या (GDS)पदांच्या तब्बल ३० हजार ०४१ जागांच्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे. या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेविना केली जाईल. दहावी उत्तीर्ण उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

आज म्हणजेच ३ ऑगस्ट २०२३ पासून सदर जागांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर, अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. मात्र, उमेदवारांना २४ ते २६ ऑगस्ट २०२३ या कालावधीत फॉर्ममध्ये दुरुस्ती करता येणार आहे.

भरती आणि भरतीचा तपशील

  • उमेदवारांची निवड दहावीच्या गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे.
  • ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर या पदांकरता ही भरती घेण्यात येणार आहे.

एवढे असेल अर्ज शुल्क :

० सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज शुल्क १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
० तर SC, ST, PWD आणि महिलांसाठी या जागांच्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
० या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरणे अनिवार्य असणार आहे.

(वाचा : Google Job Opportunity: गुगलमध्ये नोकरी मिळवायची आहे, मग या टॉप प्लेसमेंट टिप्स खास तुमच्यासाठी…)

वयोमर्यादा :

India Post GDS Recruitment मधील विविध जागांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे किमान २३ ऑगस्ट २०२३ पर्यंत वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे असणे आवश्यक आहे. शिवाय, OBC, EWS, SC, ST आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही नियमांनुसार सूट दिली जाणार आहे.

कोण अर्ज करू शकतो :

इंडिया पोस्ट GDS भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून दहावी उत्तीर्ण झालेला असणे गरजेचे आहे.
यासोबतच, उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान, संगणक व सायकलिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया :

  • उमेदवारांच्या दहावीमधील गुणांच्या आधारे त्यांची निवड केली जाणार आहे.
  • त्यानंतर, सदर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीसाठी मागवली जातील.
  • त्यानंतर वैद्यकीय चाचणी घेतली जाईल आणि अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.

अर्ज करताना ही कागदपत्रे आवश्यक असतील :

  1. आधार कार्ड.
  2. दहावीची गुणपत्रिका.
  3. मूळ पत्त्याचा पुरावा.
  4. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  5. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
  6. जात प्रमाणपत्र
  7. PWD प्रमाणपत्र (असल्यास)

(वाचा : Acharya College Hijab Controversy: मुंबईतील कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावर बंदी…? काय आहे कॉलेजची भूमिका)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.