Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मारकुट्यांना शिक्षा व्हायला हवी ; बांदोडकर आणि जोशी-बेडेकर कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून ‘प्रजापती’च्या शिक्षेची मागणी
व्हायरल झालेला व्हिडीओ हा २६ जुलै २०२३ चा असून, करोना काळानंतर कॉलेज सुरु झाल्यापासून हा प्रकार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, सदर व्हिडीओमध्ये १५ मिनिटे विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारल्याचे दृश्य सर्वांमध्ये संतापाची भावना निर्माण करत आहे. सोबतच, यापूर्वीही इतर कोणत्या सिनिअर विद्यार्थ्यानेही मारहाण केली आहे का याबद्दलही चौकशी करण्याची मागणी जोर धरतेय.
मारहाण करणारा ‘प्रजापती’ नक्की कोण…?
ठाण्याच्या बांदोडकर आणि जोशी-बेडेकर कॉलेजमध्ये एनसीसीचे एकूण तीन युनिट्स आहेत. त्यापैकी एक बांदोडकर कॉलेजचे, दुसरे जोशी-बेडेकर कॉलेजचे तर तिसरे युनिट हे या दोन्ही कॉलेजमधील विद्यार्थिनींचे आहे.
बांदोडकर आणि जोशी-बेडेकर कॉलेजमधील एनएनसी प्रशिक्षणादरम्यान दरम्यान विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करणारा सिनिअर विद्यार्थी हा एनएनसी कॅडेड असून, बांदोडकर कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणारा विद्यार्थी आहे. पीडित विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रजापती असे त्या विद्यार्थ्यांचे आडनाव आहे.
तर, व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील मार खाणारे विद्यार्थी हे जोशी-बेडेकर कॉलेजचे असल्याची माहिती समोर येत आहे.
असा मिळाला अमानुषतेचा पुरावा :
व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील मारहाणीची घटना साधारणपणे दहा-बारा दिवसांपूर्वीची आहे. कॉलेजमध्ये अभ्यासासाठी आलेल्या एका माझी विद्यार्थिनीने लायब्ररीमधून हा व्हिडीओ शूट केला आहे. “व्हिडीओ व्हायरल करणे माझा हेतू नव्हता, असे या विद्यार्थिनीने स्पष्ट केले आहे. व्हिडीओ बनवणारी ही विद्यार्थिनी फक्त अभ्यासासाठी कॉलेजमध्ये येत होती. तिला बाहेरून ओरडतानाचा आवाज आला आणि त्यानंतर तिने हा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ तिने स्टेटसला ठेवला होता. दोन-तीन जणांनी तो शेअर केला आणि तो गुरुवार, ३ ऑगस्ट २०२३ ला सदर व्हिडीओ व्हायरल झाला.
पीडित विद्यार्थी, त्यांचे पालक आणि कॉलेजमहिला इतर विद्यार्थी म्हणतात…
ठाण्याच्या बांदोडकर आणि जोशी-बेडेकर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. ज्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली त्यांना, मारकुट्या सिनिअरकडून धमकावण्यातही आले होते. त्यामुळे नाव न सांगण्याच्या अटीवरून या पीडित विद्यार्थ्यांनी माध्यमांशी संपर्क साधत खाली माहिती दिली आणि मारहाण करणाऱ्या प्रजापतीवर कारवाई करण्याची मागणीही केली.
- लॉकडाऊननंतर बांदोडकर आणि जोशी-बेडेकर कॉलेजमध्ये एनसीसी सरावाच्या दरम्यान मारहाणीचे हे प्रकार सातत्याने घडत आहेत.
- ऑनलाइन पद्धतीने शिकून आलेले सिनिअर्सच गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत.
- प्रशिक्षण देणाऱ्या सिनिअर्सना फिल्डवर काय करावे आणि प्रशिक्षण कसे दयावे याबद्दलही माहिती नाही.
- त्यामुळे, स्वतःचे अज्ञान झाकण्यासाठी प्रशिक्षणार्थी सिनिअर्स आम्हा एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मारतात.
- इतकेच नव्हे, तर मारहाणीनंतर तक्रार न करण्याविषयी अनेक धमाख्याही देतात.
- मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव प्रजापती असून, तोही असाच एक वरिष्ठ कॅडेड आहे.
- शिवाय, एनएनसी विभागाच्या देखरेखेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कॉलेजने कोणत्याही शिक्षकांची नियुक्ती केली नसल्याची खळबळजनक माहितीही या दरम्यान समोर आली. त्यामुळे या प्रकाराकडे बांदोडकर आणि जोशी-बेडेकर कॉलेज प्रशासनाचे लक्ष नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.