Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
iPhone 14 ची किंमत
आयफोन १४ च्या 128 GB स्टोरेज वेरिएंटची मूळ किंमत ७९,९०० रुपये आहे. यावर सुरु १६ टक्के फ्लॅट डिस्काउंटसह याची किंमत ६६,९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. हा Amazon वर ५ पैकी ४.५ रेटिंगसह येतो. iPhone 14 खरेदी करण्यापूर्वी काही खास ऑफर्स जाणून घ्या… नाहीतर नंतर पश्चाताप होऊ शकतो.
बँक ऑफर आणि EMI
जर तुमच्याकडे SBI कार्ड असेल तर तुम्ही फोनची किंमत आणखी १ हजार रुपयांपर्यंत कमी करू शकता. ईएमआय व्यवहारांसाठी हे कार्ड वापरल्यास ही ऑफर दिली जाईल. आता EMI बद्दल विचार केला तर EMI अंतर्गत, दरमहा ३,२१७ रुपये देऊन फोन देखील खरेदी केला जाऊ शकतो. नो कॉस्ट EMI फक्त Amazon Pay ICICI क्रेडिट कार्डवर उपलब्ध आहे ज्यासाठी तुम्हाला दरमहा ११,१६७ रुपये द्यावे लागतील.
एक्सचेंज ऑफरने मिळेल दमदार सूट
तुमच्या घरात जुना फोन असेल तर तोही एक्सचेंज ऑफरमध्ये देऊन तुम्ही आणखी दमदार सूट मिळवू शकता. तुम्हाला जुना फोन दिल्यास आणखी ५४,९५० रुपयांपर्यंत सूट दिली जाईल. जर तुम्हाला पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली तर तुम्हाला नवीन फोन फक्त १२,०४९ रुपयांमध्ये मिळू शकेल. पण इतकी मोठी एक्सचेंज मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या फोनची कंडीशन चांगली असायला हवी.
वाचा :सावध व्हा! आजकाल मोबाईल नंबर आणि लोकेशनच्या मदतीने होत आहे ऑनलाईन फ्रॉड, वाचा नेमकं प्रकरण काय?
iPhone 14 चा डिस्प्ले आणि प्रोसेसर
या फोनमध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. तसेच, हा फोन A15 बायोनिक चिपसेटने सुसज्ज आहे. फोनमध्ये फेस आयडी फीचर आहे. हे 128 GB, 256 GB आणि 512 GB स्टोरेज वेरिएंटमध्ये खरेदी केले जाऊ शकते.
वाचा : Instagram Tips : इन्स्टाग्रामवर एकदम क्लिअर व्हिडीओ कसा अपलोड करायचा? लाईक्सचा पडेल पाऊस
इतर खास फीचर्स
या शिवा फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. त्याचा पहिला सेन्सर 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. त्याच वेळी, दुसरा 12-मेगापिक्सेल वाइड सेन्सर आहे. फोनमध्ये फक्त 12 मेगापिक्सलचा TrueDepth सेंसर देण्यात आला आहे. हा फोन IP68 रेटिंगसह येतो ज्यामुळे तो पाणी प्रतिरोधक बनतो. हे MagSafe अॅक्सेसरीज आणि Qi वायरलेस चार्जरशी सुसंगत आहे.
वाचा : Online Scam : जास्त पैसे कमावण्याच्या नादात बसला लाखोंचा गंडा, एक क्लिक आणि खात्यातून ९.३५ लाख गायब