Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘आयआयटी’ आणि ‘एनआयटीला’ही टाकलं मागे! ‘या’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळाले ८५ लाखांचे पॅकेज..

11

Jadavpur University: इंजियरिंग करून असा कितीसा पगार मिळणार आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणून अनेक विद्यार्थी हल्ली ‘आयआयटी’, ‘आयआयएम’ आणि ‘एनआयटी’चा प[पर्याय निवडताना दिसतात. जिथे विद्यार्थ्यांना प्लेसमेंट कॅम्पसमध्ये कोट्यावधी रुपयांचे पॅकेजही हल्ली मिळू लागले आहेत. पण आता अशा बड्या अभ्यासक्रमांना मागे टाकून चक्क अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तब्बल ८५ लाखांचे पॅकेज मिळवले आहे.

हे पॅकेज कोलकता, पश्चिम बंगाल येथील जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळाले आहे. विशेष म्हणजे जादवपूर विद्यापीठात मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंट आणि इलेक्ट्रॉनिकच्या १००% विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आहे. तर कॉम्प्युटर सायन्सच्या ९७ टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली होती. हे विद्यापीठ सर्वाधिक प्लेसमेंट देणारे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते.

यावर्षीय या विद्यापीठात इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक म्हणजे 85 लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. त्यामुळे या घटनेची सर्वांनीच दाखल घेतली आहे. कारण अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमधून मोठ्या पगाराचे पॅकेज देणाऱ्यांमध्ये या विद्यापीठाचे नाव पुढे आले आहे.

(वाचा: Career Guidance: करिअर निवडण्यापूर्वी या सहा गोष्टी आवर्जून करा! कधीही पश्चाताप होणार नाही..)

जादवपूर विद्यापीठातील ३५ विद्यार्थ्यांना ४५ ते ५० लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. तर १०० विद्यार्थ्यांना ३५ लाख ते ४५ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज देण्यात आले आहे. या विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रमांच्या मिळून १२०० प्लेसमेंट ऑफर प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी जवळपास १००० विद्यार्थ्यांना याद्वारे नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्यातील सर्वाधिक म्हणजे ८५ लाखाचे पॅकेज एका विद्यार्थाला मिळाले आहे.

जादवपूर विद्यापीठाच्या प्लेसमेंट कॅम्पससाठी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या येतात. यामध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट, सॅमसंग, सिटी बँक, एचएसबीसी या कंपन्यांचा समावेश आहे. म्हणून या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी जीवाचे रान करत असतात. या विद्यापीठात अभियांत्रिकीच्या सर्वच शाखांचे अभ्यासक्रम चालवले जातात. इथे शिकण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी अर्ज करत असतात.

(वाचा: Recruitment 2023: १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी कर्मचारी निवड आयोगात महाभारती! एक हजाराहून अधिक जागा रिक्त..)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.