Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कारण अशा स्पर्धा परीक्षा देताना जागा १०० असतात आणि परीक्षा देणारे १ लाख परीक्षार्थी. त्यामुळे अनेकदा परीक्षा दिल्यानंतर अपयशालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे काहीजण खचतात आणि या स्पर्धा परीक्षांना ( Competitive Exams) कायमचा रामराम करतात. पण आयएएस विजय वर्धन यांची सक्सेस स्टोरी वाचून अपयश आले तरी कुणीही मागे फिरणार नाही. किंबहुना अपयशाची व्याख्याच विसरून जातील.
कारण विजय वर्धन असे आहेत ज्यांना ३५ वेळा विविध शासकीय सेवांच्या परीक्षांमध्ये अपयश आले. पण त्यांनी हार मानली नाही. अतोनात प्रयत्न करून ते देशातील सर्वात अवघड समजली जाणारी ‘यूपीएससी’ ही परीक्षा पास झालेच. शिवाय एकदा नाही तर दोनदा या परीक्षेत उत्तीर्ण होऊन ते अनुक्रमे ‘आयपीएस’ आणि मग ‘आयएएस’ झाले. (Success Story Of IAS Vijay Wardhan)
(वाचा: Mumbai University: मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय परिसंवाद आणि प्रदर्शन! चुकूनही चुकवू नये असा आहे विषय…)
विजय वर्धन हे मूळचे हरियाणाचे. त्यांचे शालेय शिक्षण हरियाणातील सिरसा येथे झाले. पुढे त्यांनी हिस्सार येथून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग केले. इंजिनीअरिंगमध्ये पदवी मिळवल्यानंतर यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी ते दिल्लीला गेले. या परीक्षेची तयारी करीत असताना त्यांनी हरियाणा पीसीएस, यूपीपीएससी, एसएससी आणि सीजीएल या आणि अशा अनेक शासकीय सेवेतील जवळपास ३५ परीक्षा दिल्या. पण प्रत्येक परीक्षेत त्यांना अपयशच मिळत गेले.
इतके अपयश पाहूनही विजय वर्धन खचले नाहीत, त्यांनी प्रयत्न करणे कधीही सोडले नाही. उलट अधिक जोमाने तयारीला लागले. विजय वर्धन यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा यूपीएससी (UPSC Exam) परीक्षा दिली होती, ज्यात ते अपयशी ठरले होते. मात्र सातत्य आणि चिकाटी यामुळे त्यांनी २०१८ मध्ये ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि १०४ रँक मिळवत ते ‘आयपीएस’ झाले.
पण ‘आयपीएस’ सारखी पोस्ट मिळूनही ते खुश नव्हते, कारण त्यांचे ध्येय काही वेगळे होते. म्हणून त्यांनी २०२१ मध्ये पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली आणि ते ‘आयएएस’ झाले. इतके अपयश मिळूनही त्यांनी आपले ध्येय गाठले. म्हणूनच सध्या ते तरुणांचे आदर्श झाले आहेत.
तरुणांना यशाचा मंत्र देताना विजय वर्धन म्हणतात की, ‘तुम्हीच तुमचे सर्वोत्तम मागर्दर्शक आहात. त्यामुळे जेव्हा एखादा निर्णय घेता तेव्हा त्यावर ठाम राहा आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. आपल्या चुकांचे आपणच मूल्यमापन करायचे आणि त्यातून आपणच शिकत राहायचे. म्हणजे एक दिवस यश हे मिळतेच.’
( फोटो सौैजन्य : विजय वर्धन यांचे इंस्टाग्राम अकाउंट)
(वाचा: ZP Recruitment 2023: महाभरती! राज्यातील 34 जिल्हा परिषदा आणि १९ हजार जागा.. असा करा अर्ज..)