Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ म्हणजेच ‘आयआयएम’ (IIM) लखनऊ यांनी ‘कॉमन ऍडमिशन टेस्ट’ (CAT 2023) साठी अधिसूचना जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या परीक्षेसाठी नावनोंदणी सुरु झाली आहे. परीक्षेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ‘आयआयएम’च्या परीक्षेसाठीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे.
अधिसूचनेत सांगितल्याप्रमाणे ‘कॅट २०२३’ साठी नोंदणी २ ऑगस्टपासून नोंदणी सुरु झाली असून १३ सप्टेंबर पर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता. मात्र १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेनंतर अर्ज भरता येणार नाही. अर्ज भरण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे ”Iimcat.ac.in ” हे अधिकृत संकेतस्थळ आहे.
ही परीक्षा २६ नोव्हेंबर २०२३ रोजी तीन सत्रांमध्ये घेण्यात येईल तर परीक्षेचे प्रवेशपत्र २५ ऑक्टोबरपर्यंत जाहीर केले जाईल. अधिसूचनेनुसार, ‘कॅट २०२३’ ही परीक्षा देशातील १५५ शहरांमध्ये घेण्यात येणार आहे. उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार कोणतीही सहा शहरे (exam centre dor iim cat 2023) निवडण्याचा पर्याय दिला जाईल.
ही प्रवेश परीक्षा ‘आयआयएम’सह देशभरातील बिझनेस स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी प्रमाण मानली जाते. ‘कॅट’ परीक्षेच्या पद्धतीनुसार या परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असतो. गेल्या वर्षीच्या पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिकेत एकूण तीन विभाग असतील. विशेष म्हणजे ही परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींच्या पात्रतेत कोणतेही बदल केलेले नाही. ‘कॅट’ देणारा परीक्षार्थी हा कोणत्याही मान्यताप्रताप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून ५० टक्के गुणांसह पदवीधर असावा. राखीव श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुणांमध्ये पाच टक्के सूट दिलेली असते..
(वाचा: UPSC Success Story: ३५ परीक्षांचे अपयश पचवणारा विजय वर्धन अखेर ‘आयएएस’ झालाच! वाचावी अशी यशोगाथा..)
‘कॉमन ऍडमिशन टेस्ट’ परीक्षेसाठीची पात्रता:
परीक्षार्थींकडे किमान ५० टक्के गुणांसह किंवा समान CGPA असलेली UG पदवी असावी.
अनुसूचित जाती (sc), अनुसूचित जमाती (ST) आणि अपंग व्यक्ती (pwd) श्रेणीतील परीक्षार्थींना ४५ टक्के पात्रता गुण असणे आवश्यक आहे.
जे परीक्षार्थी UG पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा देत आहेत किंवा ज्यांनी पदवी पूर्ण केली आहे आणि ते निकालाची वाट पाहात आहेत तेही या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
परीक्षेसाठी नोंदणी शुल्क:
‘कॅट २०२३’ परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी SC, ST आणि PwD श्रेणीतील उमेदवारांना १२०० रूपये तर इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना २४०० रूपये नोंदणी शुल्क भरावे लागेल .
अर्ज कसा कराल?
इच्छुक उमेदवारांनी ‘IIM’ च्या अधिकृत संकेतस्थळावर iimcat.ac.in भेट द्यावी.
त्यानंतर मुख्यपृष्ठावरील ‘CAT 2023’ नोंदणीवर क्लिक करून युनिक युजर आयडी आणि पासवर्ड तयार करावा..
पुढे अर्ज भरण्यासाठी जनरेट केलेला युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे आणि अर्ज भरावा.
(वाचा: Career Guidance: करिअर निवडण्यापूर्वी या सहा गोष्टी आवर्जून करा! कधीही पश्चाताप होणार नाही..)