Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सदर भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण या संबंधित अधिकची माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.
पदाचा तपशील :
पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow)
एकूण रिक्त जागा – १०५
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त कॉलेज आणि विद्यापीठामधून ६० टक्के गुणांसह फिजिक्स/ केमिस्ट्री/ लाईफ सायन्स विषयात पदवी (BSc)
किंवा
५५ टक्के किंवा त्याहून अधिक गुणांसह एमएससी (MSc) म्हणजेच + ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
(वाचा : Pune ZP Recruitment: पुणे जिल्हा परिषदेतील एक हजार पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात)
वयोमर्यादा :
खुला प्रवर्ग – १८ ते २८ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षे सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
(अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराच वय २८ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक)
अर्ज शुल्क :
खुला गट आणि ओबीसी वर्गातील उमेदवार – ५०० रुपये.
मागासवर्गीय आणि सर्व महिला उमेदवार – फी नाही.
नोकरी ठिकाण – मुंबईसह देशभरात
महत्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ४ ऑगस्ट २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑगस्ट २०२३
(वाचा : Indian Navy Recruitment 2023: भारतीय नौदलात एसएससी आयटी एक्झिक्युटिव्हच्या पदांवर भरती, अर्ज कसा करावा)
असा करा अर्ज :
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
- उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
- इतर कोणत्याही वेबसाईटवर अथवा माध्यमातून केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही
- ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
- अर्ज करत असताना सर्व मूलभूत शैक्षणिक कागदपत्र योग्यता प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- संपूर्ण अर्ज भरला झाल्यानंतर सर्व माहिती आवश्यक पडताळणी केल्यानंतर अंतिम अर्ज सबमिट करा.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२३ देण्यात आलेली आहे, याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी जाहीरातीत देण्यात आलेल्या माध्यमातून बीएआरसीसोबत संपर्क साधावा.