Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Vijay Sales चा खास Apple Days Sale
तर विजय सेल्सच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्टोअर्समध्ये या ऑफर सुरु आहेत. त्यामुळे कंपनीच्या १२५ हून अधिक रिटेल आउटलेट आणि अधिकृत वेबसाइटद्वारे विजय सेल्समधून Apple प्रोडक्ट्स खरेदी केली जाऊ शकतात. या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही iPhone 14 चा 128 GB व्हेरिएंट फक्त ४२,९०० रुपयांना खरेदी करू शकता. हाच कॅशबॅक, ट्रेड आणि एक्सचेंज बोनस एचडीएफसी बँकेकडूनही दिला जात आहे.
iPhone वरही भन्नाट ऑफर
तर या सेलमध्ये विविध Apple प्रोडक्ट्सवर खास ऑफर्स सुरु असून यात iPhone 14 च्या 128 GB व्हेरिएंटची किंमत ६९,९०० रुपये आहे. ज्यावर HDFC कार्डद्वारे खरेदीवर ४००० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तसेच, स्टोअरमध्ये १५ हजार आणि त्याहून अधिकची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. याशिवाय ८ हजार रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. अशा प्रकारे एकूण ३७००० रुपयांची सूट मिळवण्याची संधी आहे. या प्रकरणात, iPhone 14 च्या 128 GB मॉडेलची अंतिम किंमत ४२,९०० रुपये होईल.
Macbook ही मिळणार कमी किंमतीत
या सेलमध्ये MacBook ७५,९०० रुपयांना खरेदी करता येईल. यामध्ये M1 चिपसेट देण्यात आला आहे. M2 चिपसेट असलेला लॅपटॉप १,०१,९९० रुपयांना मिळेल. हे लॅपटॉप एचडीएफसी कार्डने खरेदी केल्यास आणखी ५००० रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.
वाचा : Instagram Tips : इन्स्टाग्रामवर एकदम क्लिअर व्हिडीओ कसा अपलोड करायचा? लाईक्सचा पडेल पाऊस
Apple Watch ही मिळेल स्वस्तात
Apple Watch Series 8 या सेलमध्ये ३९,४९० रुपयांना खरेदी करता येईल. तसंच जर तुम्ही सेकंड जनरेशन ऍपल वॉच एसई पाहात असाल तर ती २५,९०० रुपयांना खरेदी करू शकता. त्याच Apple Watch Ultra ची किंमत ७७,९९९ रुपये आहे.
वाचा : iPhone 15 चा लाँचिंग इव्हेंट १५ सप्टेंबरला? समोर आली महत्त्वाची माहिती
iPad वरही भन्नाट ऑफर
या सेलमध्ये आयपॅडवरही खास ऑफर आहे. आयपॅडच्या 9th जनरेशन आयपॅडची किंमत २५,९९० रुपये आहे. तसंच तुम्ही ३८,९९० रुपयांमध्ये 10th जनरेशनचे आयपॅडही खरेदी करू शकता. तसंच तुम्ही 5th जनरेशन iPad ५१,९९० रुपयांना खरेदी करू शकता.
वाचा : JioBook येताच भारतात लॅपटॉप आयात करण्यावर बंदीचा नियम? काय आहे नेमकं कनेक्शन?