Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१००-१५० नव्हे थेट २४०वॉट फास्ट चार्जिंग; कंपनीनंच सांगितला Realme GT 5 चा चार्जिंग स्पीड

14

Realme GT 5 लवकरच बाजरात येणार आहे. अद्याप कंपनीनं ह्या स्मार्टफोनची कन्फर्म लाँच डेट सांगितली नाही परंतु लाँचपूर्वीच कंपनीनं ह्या स्मार्टफोन संबंधित माहिती दिली आहे. अलीकडेच कंपनीनं कंफर्म केलं होतं की हा फोन 24GB RAM सह लाँच होईल. आता कंपनीनंयाची चार्जिंग स्पीडची माहिती दिली आहे.

Realme नं आपल्या चीनी माइ्क्रो ब्लॉगिंग साइट वीबोवर टीजर पोस्टर शेयर करून Realme GT 5 फोनचा चार्जिंग स्पीड कंफर्म केला आहे. टीजर पोस्टरनुसार रियलमी जीटी ५ स्मार्टफोनमध्ये २४०वॉट सुपरफास्ट चार्जिंग स्पीड दिली जाईल. ह्याआधी टीजर पोस्टरच्या माध्यमातून कंपनीनं माहिती दिली होती की फोनमध्ये 24GB RAM दिला जाईल.

वाचा: सावधान! AI लाही कान असतात! फक्त टायपिंग ऐकून पासवर्ड ओळखणारं एआय आलं

रियलमी फोनमध्ये २४०वॉट फास्ट चार्जिंग मिळण्याची ही काही पहिली वेळ नाही. ह्याआधी देखील कंपनीनं Realme GT Neo 5 स्मार्टफोन २४०वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह लाँच केला होता. ग्लोबल मार्केटमध्ये जो Realme GT 3 नावानं सादर केला होता. त्यानंतर आता कंपनीच्या रियलमी जीटी ५ फोनमध्ये फास्ट चार्जिंग स्पीडसह येत आहेत.

Realme GT 5 चे संभाव्य फीचर्स

कंपनीनं कंफर्म केलेल्या फीचर्ससह फोनच्या अन्य स्पेसिफिकेशन्सची माहिती लीकमधून समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रियलमीचा आगामी फ्लॅगशिप फोन ६.७४ इंचाचा ओएलईडी डिस्प्लेसह येऊ शकतो. ह्या डिस्प्लेचं रिजोल्यूशन १.५के पिक्सल आणि रिफ्रेश रेट १४४Hz आहे. तसेच, फोन स्नॅपड्रॅगन ८ जेन २ प्रोसेसर असेल. तसेच फोनमध्ये २४जीबी रॅम दिली जाईल.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. ह्या कॅमेरा सेटअपमध्ये ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स ८९० चा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो, जोडीला OIS सपोर्ट मिळेल. ह्यात ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देखील मिळू शकतो.

वाचा: सर्वांच्या आवाक्यात येऊ शकतो 200MP चा कॅमेरा; Redmi Note 13 सीरीजच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

लीकनुसार, फोन दोन बॅटरी व्हेरिएंटमध्ये येऊ शकतो. एका व्हेरिएंटमध्ये ४,६००एमएएचची बॅटरी असू शकते, जोडीला २४०वॉट सुपरफास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. तसेच, ५२००एमएएचची बॅटरी असलेल्या व्हेरिएंटमध्ये १५०W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.