Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लई भारी! स्वातंत्र्याची ७६ वर्ष अन् ७६ कोटींची कमाई, ‘बाईपण भारी देवा’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट

15

मुंबई: केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाची घोडदौड काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकुळ माजवला आहे. दिग्दर्शक केदार यांनी सिनेमा आल्यापासून एक वाक्य अनेकदा म्हटले आहे आणि ते म्हणजे, ‘एक स्त्री घर चालवते तर, सिनेमा नक्कीच चालवू शकते’. या सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहत हे वाक्य अगदीच खरं ठरलं आहे. ३० जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि लवकरच या सिनेमाचे सिनेमागृहात एकूण ५० दिवस पूर्ण होणार आहेत.

‘बाईपण भारी देवा’ थिएटरध्ये ५० दिवसांचं यश साजरं करेल, त्यापूर्वी सिनेमाच्या कमाईविषयी एक आनंदाची बातमी केदार यांनी सोशल मीडियावर शेअर केली. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने ७६.०५ कोटींचे कलेक्शन केले आहे. दरम्यान रंजक बाब म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवशी बाईपण भारी देवा’ने ७६ कोटींची कमाई केली. यानंतर दिग्दर्शक, कलाकार आणि सिनेमाची संपूर्ण टीम यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

अस्मिताची नवी खेळी, सायली-कुसूमवर केले गंभीर आरोप; अधिक मासाचे वाण देण्यावरुन दोघींनाही रडवलं
केदार यांनी ही आनंदाची बातमी शेअर करताना अशी कॅप्शन दिली की, ‘भारतमाता की जय! बाईपण भारी देवा या सिनेमाने आणखी भरारी मारली. खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टी स्वतंत्र झाली. सहा लक्ष्मींच्या पावलाने चित्रपटगृहात गर्दी सुरू झाली आणि ती इतर सिनेमांनाही फायद्याची ठरली! एक स्त्री घर चालवते तर, सिनेमा नक्कीच चालवू शकते. याची ग्वाही या सिनेमाच्या निमित्ताने दिली गेली. लवकरच ५० वा दिवस साजरा करू. सहकुटुंब सहपरिवार आता गर्दी होते आहे. पुढची वाटचाल सोपी नाही पण अवघडही नाही. कारण तुम्ही सोबत आहात. श्री स्वामी पाठीशी आहेत. आणि श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद टप्प्या टप्यावर मिळतो आहे.’


‘बाईपण भारी देवा’चे हे ऐतिहासिक यश त्यांनी मायबाप रसिकांच्या चरणी अर्पण करत असल्याचे केदार यांनी या पोस्टमध्ये म्हटले. आता ७६ कोटींचा टप्पा गाठल्यानंतर सिनेमा लवकरच १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत. शिवाय मराठीमध्ये ‘सैराट’चा असणारा सर्वोच्च कमाईचा रेकॉर्ड ‘बाईपण भारी देवा’ मोडेल का हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.

बाईपण भारी देवा’ चित्रपटाला तोबा गर्दी, गर्दी पाहून व्यवस्थापकांची तारांबळ



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.