Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

AMOLED डिस्प्ले, Spo2 सह अनेक हेल्थ फीचर, Oppo Watch 4 Pro लवकर होणार लाँच

9

नवी दिल्ली : Oppo Watch 4 Pro Smartwatch : स्मार्टफोन तयार करण्यात आघाडीवर असणाऱ्या ओप्पो कंपनीने भारतीय बाजारात Oppo Watch 4 Pro ही स्मार्टवॉच लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. २९ ऑगस्ट रोजी चीनी बाजारात हे प्रोडक्ट लाँच केले जाऊ शकते. या दरम्यान Oppo Find N3 फ्लिप देखील लाँच केला जाऊ शकतो. यात LTPO AMOLED पॅनेलसह ऑलवेज ऑन डिस्प्ले असेल. Oppo स्मार्टवॉच तापमान सेन्सर सपोर्टसह ऑफर केले जाऊ शकते. चला जाणून घेऊया या स्मार्टवॉचबद्दल सविस्तर…

हे स्मार्टवॉच आयताकृती डायलसह सादर करण्यात आले आहे. टीझरमध्ये पाहिल्यावर कळतं की, Oppo Watch 4 Pro LTPO AMOLED स्क्रीनसह येईल. हे Snapdragon W5 Gen 1 आणि BES 2700 सह ड्युअल चिपसेटद्वारे सपोर्टेड असेल. याशिवाय यात अनेक सेन्सर दिले जाऊ शकतात, ज्यामध्ये हार्ट रेट सेन्सर, ब्लड ऑक्सिजन सेन्सर, मनगटाचे तापमान सेंसर, ईसीजी सेन्सरच्या मदतीने अचूक हेल्थ ट्रॅकिंगचा समावेश असेल. हे स्मार्टवॉच 2GB ऑपरेशनल मेमरीसह येणार आहे.

हेल्थ फीचरसह 5ATM ची सेटिंग
तसंच Oppo Watch 4 Pro चा अपग्रेड केलेला प्रकार Oppo Watch 3 Pro असेल. याचे 378×496 पिक्सेल रिझोल्यूशन आहे. त्याची पिक्सेल घनता 326ppi आहे. यात १.९१ इंच LTPO फुल-कर्व्ह लवचिक डिस्प्ले आहे. हे Qualcomm Snapdragon W5 Gen 1 SoC द्वारे सपोर्डेट आहे. यात 1GB रॅम आणि 32GB इनबिल्ट स्टोरेज आहे. हे ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर, SpO2, ECG, सभोवतालचा प्रकाश आणि हवेचा दाब या सेन्सरसह येते. यात पाणी, स्प्लॅश यापासून वाचण्याकरता 5 ATM रेटिंग दिली गेली आहे.

वाचा : 5000mAh बॅटरी आणि 256GB स्टोरेज, दमदार फीचरसह Vivo Y78+ (T1) लाँच

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.