Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जिकत नाही जवर तवर झुंजत राह्याचं…१८ ऑगस्टला ‘सुभेदार’ प्रदर्शित होणार नाही, समोर आलं मोठं कारण

7

मुंबई: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवअष्टक’ मधला आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १८ ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. हा सिनेमा आता १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार नाहीये. या सिनेमाच्या प्रदर्शनाची नवीन तारिख अभिनेता चिन्मय मांडलेकर यानं एक पोस्ट शेअर करत सांगितली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावळ्यानं स्वराज्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. आयुष्यात फक्त एकच देव मानून सर्व शूर मावळे कार्य करत राहिले; तो देव म्हणजेच ‘छत्रपती शिवाजी महाराज’. प्रचंड कर्तव्यनिष्ठा दाखवत स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या नरवीर तान्हाजी मालुसरे यांना स्वराज्याच्या चाकरीपुढं आपल्या संसाराचेही भान नव्हतं. स्वतःच्या मुलाचं लग्न काढलं असताना सिंहगड मोहिमेचा सांगावा आल्यानंतर हा धैर्याचा मेरुपर्वत काळासारखा धावून गेला अन् वचनाच्या पूर्ततेसाठी मागं न हटता आपला देह स्वामी निष्ठेपायी शिवप्रभूंच्या चरणी ठेवला. ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी गर्जना करत मोहीम फत्ते करणाऱ्या या शूर योद्ध्याला त्यांच्या कुटुंबानेही तितकीच मोलाची साथ दिली. अशा या नरवीर तान्हाजी मालुसरे पराक्रम पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकत असताना निर्मात्यांनी चित्रपटाची तारिख बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

केव्हा होणार प्रदर्शित?
जिकत नाही जवर तवर झुंजत राह्याचं…! आम्हीही शिवरायांचे मावळे आहोत, अडचणींवर मात करणार आणि २५ ऑगस्टला तुमच्या भेटीस नक्की येणार.. असं म्हणत चिन्मय मांडलेकर यानं सिनेमाच्या प्रदर्शनाची नवीन तारिख सांगितली आहे.

खरं तर सुरुवातीला २५ ऑगस्ट हिच तारिख जाहिर करण्यात आली होती. पण नंतर या सिनेमाचं प्रदर्शन १८ ऑगस्टला होईल, असं सांगण्यात आलं. आता पुन्हा एकदा हा सिनेमा २५ ऑगस्ट रोजीच थिएटरमध्ये झळकणार आहे.

दरम्यान, सिनेमाविषयी बोलताना दिग्पाल म्हणतो की, ‘हिंदवी स्वराज्याच्या शूर मावळ्यांचं शौर्य जाणून घेताना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचे पदर फार क्वचितच सिनेमातून पहायला मिळतात. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे तर शिवचरित्राच्या महान ग्रंथातील एक झळाळते सुवर्णपान! त्यांचं भावनिक आणि कौटुंबिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या शौर्याचं पराक्रमी पान उलगडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.’

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.