Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘अप्लाइड आर्ट्स’ क्षेत्रात करिअर करायचे आहे; हे ५ अभ्यासक्रम तुमचे भविष्य प्रकाशमय करतील

19

Courses Available In Applied Arts: माणसाकडे चित्रकला आणि चित्रकलेची जाण जन्मजात असते असे म्हणतात. अनेकांसाठी हे माध्यम फावल्या वेळातील विरंगुळा असते तर काहींना याच क्षेत्रात करिअर करून कलाकार म्हणून उत्कृष्ट बनायचे असेल. तर ‘उपयोजित कला (Applied Arts) मधील बारकावे समजून घेण्यासाठी, या विषयातील ज्ञान संपादन करण्यासाठी योग्य प्रशिक्षण घेणे गरजेचे असते.

या विषयाचे अभ्यासक्रम ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध असतात. हे अभ्यासक्रम पदवी, पदव्युत्तर, डॉक्टरेट, डिप्लोमा आणि प्रमाणपत्र स्तरावर दिले जातात. तर, या विषयातील शिक्षण घेण्यासाठी विविध कोर्सेस, त्याचे शुल्क, भविष्यत मिळणार पगार आणि या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी पात्रता यांविषयी जाणून घेऊया.

1. प्रमाणपत्र (Certificate Course) :

कोर्स: उपयोजित कला अभ्यासक्रमातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
सरासरी शुल्क: १ हजार ते १५ हजार
सरासरी वेतन: मासिक सरासरी वेतन रुपये १० हजार ते १५ हजार रुपये
अभ्यासक्रम: अप्लाइड आर्ट्समधील टॉप सर्टिफिकेट अभ्यासक्रमामध्ये व्हिज्युअल आर्ट्स, ग्राफिक डिझायनिंग, अप्लाइड आर्ट्स इ. अनेक संस्था आणि कॉलेजांमध्ये उपलब्ध आहेत.

(वाचा : Career In Architecture Industry: आर्किटेक्ट बनून घडवायचंय भक्कम करिअर..? मग ही माहिती तुमच्यासाठी)

2. डिप्लोमा किंवा पीजी डिप्लोमा (Diploma or PG Diploma In Applied Arts) :

कोर्स: डिप्लोमा आणि पीजी डिप्लोमा इन अप्लाइड आर्ट्स आणि क्राफ्ट्स ऑफर विविध संस्थांमध्ये उपलब्ध आहेत.
कालावधी: १ ते ३ वर्षे
पात्रता: या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
सरासरी शुल्क: १० हजार ते १ लाख रुपये
सरासरी वेतन: मासिक सरासरी वेतन रुपये १० ते ३० हजार रुपयांपर्यंत
अभ्यासक्रम: डिप्लोमाआणिपीजीडिप्लोमाकोर्स, डिप्लोमा इन अप्लाइड आर्ट्स आणि क्राफ्ट्स

3. अप्लाइड आर्ट्स कोर्स आणि पारंपारिक हस्तकला (Bachelor of Fine Arts) :

कोर्स: UG: BFA अप्लाइड आर्ट्स कोर्स आणि पारंपारिक हस्तकला
कालावधी: ३ ते ४ वर्षे
पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक.
सरासरी शुल्क: २ लाख रुपयांपर्यंत
सरासरी वेतन: मासिक सरासरी वेतन रुपये २ ते ३ लाख रुपये

(वाचा : Top 12 Skillful Career Courses: कौशल्यपूर्ण करिअर वाटांचा पर्याय तुमच्यासाठी खास; या कोर्सेसनंतर करिअर विकासाच्या हटके संधी)

4. उपयोजित कला आणि हस्तकला (Master of Fine Arts in Painting) :

कोर्स: उपयोजित कला आणि हस्तकला
कालावधी: २ वर्षे
पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम, BFA (Bachelor of Fine Arts) मध्ये उत्तीर्ण किंवा कला शाखेतून कोणतीही समकक्ष पदवी.
सरासरी शुल्क: १ ते ४ लाख रुपयांपर्यत
सरासरी वेतन: मासिक सरासरी वेतन रुपये १ ते ४ लाख रुपयांपर्यत

5. डॉक्टरेट (Doctorate)

कोर्स: डॉक्टरेट, पीएच.डी. अप्लाइड आर्ट्स मध्ये
कालावधी: २ वर्षे
पात्रता: कला शाखेतील पदव्युत्तर पदवीसह पीजी अभ्यासक्रमामध्ये उत्तीर्ण.
सरासरी शुल्क: १ ते ५ लाख रुपये
सरासरी वेतन: मासिक सरासरी वेतन रुपये ३ ते ६ लाखांपर्यंत

(वाचा : Digital Marketing: डिजीटल मार्केटिंग म्हणजे नेमके काय? कोणत्या आहेत भविष्यातील संधी)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.