Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जगभरात जाणाऱ्या iPhone 15 वर असणार भारताची छाप; ‘या’ शहरात होणार निर्मिती

12

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की भारत जगातील दुसरा मोठा मोबाइल निर्माता देश बनला आहे. कारण सॅमसंग, शाओमी आणि विवो सारख्या कंपन्या आपले स्मार्टफोन देशात बनवत आहेत. आता ह्यात अमेरिकन कंपनी अ‍ॅप्पलचा देखील समावेश होणार आहे. कारण आगामी iPhone 15 ची निर्मिती लवकरच तामिळनाडूमधील श्रीपेरंबुदूरमध्ये सुरु होणार आहे. ह्यापूर्वी आयफोन १४ ची निर्मिती देखील झाली होती परंतु फोन लाँच झाल्यावर काही महिन्यांनी भारतात आयफोन बनत होते. परंतु आता आयफोन १५ पुढील महिन्यात लाँच होताच भारतीय बनावटीचे हँडसेट ग्लोबल मार्केटमध्ये जातील.

iPhone 15 वर भारताचं नाव

मीडिया रिपोर्टनुसार, Apple चे हार्डवेयर डिवाइस बनवणारी कंपनी Foxconn टेक्नॉलॉजी ग्रुप भारतात बनणाऱ्या आयफोन यूनिट्सची संख्या वाढवू इच्छित आहे, त्यामुळे कंपनीनं चीनच्या फॅक्टरीमधून शिपिंग सुरु झाल्यानंतर काही आठवड्यांनी भारतात बनलेल्या डिवाइस डिस्ट्रीब्यूशनची योजना बनवली आहे.

वाचा: काय सांगता? फक्त ४ ग्राम वजनाचे इअरबड्स! ५५ तास बॅटरी बॅकअपसह किंमत १,४९९ रुपये

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, पेगाट्रॉन आणि विस्ट्रॉन देखील भारतात आयफोन १५ च्या निर्मितीवर काम करत आहेत. त्यासाठी कंपोनंट सोर्सचा शोध सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे आयफोन १५ ची निर्मिती लवकरच भारतात सुरु होईल अशी अपेक्षा आहे. कंपनीनं अद्याप अधिकृतपणे आयफोन १५ च्या भारतीय मॅन्युफॅक्चरिंग बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. वशेष म्हणजे अ‍ॅप्पल भारतात ७ टक्के आयफोन तयार करते जो दर आयफोन १५ च्या वेळी वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

आयफोन १५ सीरीज कधी येणार बाजारात

अ‍ॅप्पलने आतापर्यंत आयफोन १५ सीरीजच्या लाँच बद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार, ही सीरीज सप्टेंबरच्या मध्यभागी लाँच केली जाऊ शकते. ह्या लाइनअप अंतगर्त चार डिवाइस iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max येऊ शकतात. आयफोन १५ सीरीजच्या फोनमध्ये ए१६ बायोनिक चिपसेट आणि एचडी डिस्प्ले मिळू शकतो. तसेच डिवाइसमध्ये जास्त रॅम, सुधारित बॅटरी आणि कॅमेरा दिला जाऊ शकतो.
वाचा: आयफोन युजर्सना कंपनी देणार प्रत्येकी 5000 रुपये; जाणून घ्या नियम व अटी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.