Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तलाठी पदाच्या या ४३४४ जागांच्या भरतीसाठी संपूर्ण राज्यातून तब्बल १३ लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत. या अगोदर तलाठीसाठी परीक्षा फक्त एका दिवशी होणार होती परंतु आता ही परीक्षा तब्बल १९ दिवस चालणार आहे.काही दिवसांपूर्वी या परीक्षेचे वेळापत्रकही अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
तलाठी भरती परीक्षेसाठी TCS कंपनीच्यावतीने तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी आवश्यक असणारी ही परीक्षा १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत १९ दिवस असून, ही परीक्षा ३ सत्रांमध्ये घेतली जाणार आहे.
(वाचा : DRDO Recruitment 2023: डीआरडीओमध्ये ‘सायंटिस्ट बी’ पदाच्या २०४ जागांसाठी भरती; ३१ ऑगस्ट अर्ज सादर करायची अंतिम तारीख)
परीक्षेच्या नियोजित तारखा खालील प्रमाणे :
१७ ऑगस्ट २०२३ ते २२ ऑगस्ट २०२३
२६ ऑगस्ट २०२३ ते २९ ऑगस्ट २०२३
३१ ऑगस्ट २०२३ आणि १ सप्टेंबर २०२३
४ सप्टेंबर २०२३ ते ६ सप्टेंबर २०२३
८ सप्टेंबर २०२३ आणि १० सप्टेंबर २०२३
१३ सप्टेंबर २०२३ आणि १४ सप्टेंबर २०२३
(वरील सर्व तारखांना सत्राची वेळ)
सत्र १ : सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ : दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ : सायंकाळी ४.३० ते ६.३०
(परीक्षेच्या तारखांची मुख्य जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे :
सदर भरतीमधील जागांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्राचे नाव परीक्षेपूर्वी किमान ५ ते ६ सहा दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जाईल.
परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) उमेदवारांना परीक्षेपूर्वी ३ दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जाईल.
या बाबतीतील माहिती उमेदवारांना मोबाईल, ई-मेल, आणि अर्जासाठी वापरण्यात आलेल्या प्रोफाईलवर उपलब्ध करून देण्यात येईल.
(परीक्षेचे नियोजन आणि इतर माहिती शासनाच्या वतीने अधिकृत वेबसाइटवर प्रदर्शित करण्यात आली आहे.)
आज मिळणार हॉलतिकीट :
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांच्या भरतीच्या परीक्षेच्या आता तोंडावर आल्या आहेत. TCS च्या वतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून, TCS आणि शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांनुसार परीक्षेचे प्रवेश पत्र (Talathi Bharti Hall-ticket) उमेदवारांना परीक्षेपूर्वी ३ दिवस अगोदर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार, तलाठी भरतीसाठी अर्ज करून पात्र ठरलेल्या उमेदवारांना आजपासून हॉलतिकीट अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. Hall Ticket संदर्भातील माहिती उमेदवाराच्या मोबाईल, ईमेल आयडी वर पाठवली जाईल. सर्व उमेदवारांनी त्यांचे ईमेल युजर आयडी एकदा चेक करून पाहावे की मेल आयडी जो दिलेला आहे तो, मोबाईल नंबर जो दिलेला आहे तो आपण बरोबर दिलेला आहे की नाही याची पडताळणी अगोदरच करावी.
(वाचा : BARC Recruitment 2023: भाभा अणु संशोधन केंद्रात १०५ पदांसाठी भरती सुरु; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी)
परीक्षेचे स्वरूप :
- तलाठी पदभरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल.
- मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी/ अंकगणित या विषयांसाठी प्रत्येकी ५० गुण, अशी एकूण २०० गुणांची परीक्षा उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने द्यावी लागणार आहे.
- प्रत्येक विषयाच्या विभागात २५ प्रश्न असून, प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी २ गुण असतील.
- सदर परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समान असेल. परंतु, मराठी आणि इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (बारावी) समान राहील.
- निवडप्रक्रियेत पात्र होण्यासाठी उमेदवाराला किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य असेल.
तलाठी पदभरतीबाबत अधिक माहितीसाठी, आणि तुमचे हॉलतिकीट मिळवण्यासाठी (Download करण्यासाठी) http://mahabhumi.gov.in या वेबसाईटला भेट द्या.