Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Xiaomi MIX Fold 3 की किंमत
Xiaomi MIX Fold 3 चे तीन स्टोरेज व्हेरिएंट बाजारात आले आहेत. ह्यातील १२जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८,९९९ चायनीज युआन म्हणजे सुमारे १,०३,००० रुपये ठेवण्यात आली आहे. तर १६जीबी रॅम व ५१२जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ९,९९९ चायनीज युआन म्हणजे सुमारे १,१४,५०० रुपये आहे तर १६जीबी रॅम व १टीबी स्टोरेज मॉडेल १०,९९९ चायनीज युआन १,२६,७०० रुपयांचा आहे. हा डिवाइस Moon Shadow Black आणि Xingyao Gold सारख्या कलर्स मध्ये विकत घेता येईल.
Xiaomi MIX Fold 3 चे स्पेसिफिकेशन्स
मिक्स फोल्ड ३ मध्ये २के रिजॉल्यूशन असलेला ८.०३-इंच फोल्डेबल ई६ अॅमोलेड एलटीपी डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि एफएचडी+ रिजॉल्यूशन असलेला ६.५६-इंचाचा अॅमोलेड सेकंडरी डिस्प्ले आहे. स्क्रीनवर अल्ट्रा-थिन फ्लेक्सिबल ग्लासचा वापर झाला पाहिजे. इतकंच नव्हे तर ह्यात कॉर्निंग गोरिल्ला विक्टस २ चं प्रोटेक्शन देखील मिळतं. तसेच इनर डिस्प्लेवर UTG प्रोटेक्शन आहे.
डिवाइसमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट आहे. हा ४nm प्रोसेस वर चालतो. हा मोबाइल अँड्रॉइड १३ आधारित MIUI १४ वर चालतो. जोडीला १६जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबी पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हा डिवाइस ओपन केल्यावर ४.९३ मिमी जाड आणि फोल्ड केल्यावर १०.८६ मिमी जाड आहे.
Xiaomi MIX Fold 3 मध्ये Leica ट्यून असलेला क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर OIS आणि LED फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचा Sony IMX800 प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच १३ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड, १० मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स ३.२X ऑप्टिकल झूम आणि १० मगापिक्सलची पेरिस्कोप लेन्स ५x ऑप्टिकल झूमसह मिळते. सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
मिक्स फोल्ड ३ मध्ये तीन खास पावर सर्ज चिपसेटसह ४८००mAh ची बॅटरी आहे. त्याचबरोबर फोन ६७वॉट वायर्ड फास्ट चार्जिंग आणि ५०W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.