Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तर LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. एलसीडी डिस्प्ले कंपन्या OLED पेक्षा स्वस्त आहेत. पण LCD डिस्प्लेवर येणारी चित्रं ही तितकी खास नसतात त्याची बॅकलाईट नेहमी चालू असते. त्यामुळे इतर डिस्प्लेसारखा प्रिमीयम फील येत नाही. तसंच OLED म्हणजे ऑर्गेनिक लाइट एमिटिंग डायोड. OLED डिस्प्ले एलसीडीपेक्षा चांगले कॉन्ट्रास्ट, अधिक भारी रंग ऑफर करतात. OLED डिस्प्ले स्लिम, हलके आणि अधिक लवचिक आहेत. कंपन्यांना LCD पेक्षा OLED डिस्प्ले अधिक महाग वाटतात. त्यामुळे, वापरकर्त्यांना सहसा कमी किंमतीच्या फोनमध्ये एलसीडी डिस्प्ले मिळतो. तसंच AMOLED म्हणजे Active Matrix Organic Light Emitting Diode आणि OLED डिस्प्ले तंत्रज्ञानाची प्रगत आवृत्ती आहे जी प्रत्येक वैयक्तिक पिक्सेल नियंत्रित करण्यासाठी एनाबल मॅट्रिक्स टेक्नोलॉजी वापरते. सोप्या शब्दात, याचा अर्थ असा की AMOLED डिस्प्लेमध्ये OLED डिस्प्लेची सर्व वैशिष्ट्ये आहेत परंतु ती कमी उर्जा वापरते. हा त्याचा एक प्लस पॉइंट आहे.
OLED Vs AMOLED डिस्प्ले: फोन डिस्प्लेसाठी OLED पेक्षा AMOLED चांगले मानले जाते. AMOLED डिस्प्ले प्रत्येक पिक्सेलला लगेच चालू किंवा बंद करू शकतो, ज्यामुळे डिस्प्लेच्या आउटपुटवर पूर्ण नियंत्रण मिळते. त्याच वेळी, ओएलईडी पॅनेल लाइननुसार पिक्सेल नियंत्रित करते. AMOLED चे हे काम फासट केल्याने, इमेज क्वालिटी चांगली येते. रंग अचूकता आणि उर्जा कार्यक्षमतेच्या बाबतीत AMOLED हे OLED पेक्षा चांगले आहे. हे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर चांगले असल्यास फोनला चांगली बॅटरी लाइफ मिळते.
LCD vs OLED डिस्प्ले: LCDs पिक्सेल प्रकाशित करण्यासाठी बॅकलाइट वापरतात, तर OLED आणि AMOLED डिस्प्लेमध्ये सेल्फ-एमेसिव्ह पिक्सेल असतात जे प्रत्येक पिक्सेलवर स्वतंत्रपणे प्रकाश टाकतात. OLED आणि AMOLED डिस्प्ले अधिकतर हलके रंग आणि डार्क काळ्या रंगांसह चांगली पिक्टर क्वॉलिटी प्रदान करतात, पण यांचं मॅनफॅक्टरिंग अधिक महाग असू शकते. दुसरीकडे, एलसीडी अधिक किफायतशीर आहे, पण व्हिज्युअल अनुभव OLED पेक्षा कमी आहे.
वाचा : शेजाऱ्यांचं नवं काहीतरी! WhatsApp ला टक्कर देण्यासाठी स्वतःचं Beep Pakistan अॅप आणलं