Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रिलीजच्या ७ व्या दिवशीही गदर २ ची गाडी सुसाट, पण थोडक्यात चुकला ३०० कोटींचा टप्पा

22

मुंबई- हिंदी चित्रपटसृष्टीसाठी गेला आठवडा खूप चांगला ठरला. ‘गदर २’च्या रिलीजने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या चित्रपटाने पुन्हा एकदा तीच जादू निर्माण केली आहे जी २२ वर्षांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळाली होती. तिकीट खिडकीवर प्रेक्षकांची गर्दी, सिनेमागृहांमध्ये वाजणाऱ्या शिट्ट्या, ‘गदर २’च्या सुपर यशाची साक्ष देत आहेत. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या गदर २ ने आपला पहिला आठवडा यशस्वीरित्या पूर्ण केला. या चित्रपटाने ७ दिवसांत बंपर कमाई केली आहे. पण तरीही सिनेमाचा ३०० कोटी रुपयांचा टप्पा अगदी थोडक्याने चुकला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी चित्रपटाच्या कमाईत २८% ची घसरण नोंदवण्यात आली आहे.

२२ वर्षानंतरही तारासिंग आणि सकिनाच्या केमिस्ट्रीची भुरळ, गदर २ पाहून प्रेक्षक भारावले

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ची बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या ‘OMG २’शी टक्कर झाली. गुरुवारी पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही चित्रपटांच्या कमाईत घसरण झाली. वीकेंड आणि स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीनंतर, एक दिवस आधी बुधवारी ‘गदर २’ च्या कमाईत सुमारे ४१% घट झाली. तर गुरुवारी पुन्हा एकदा त्याच्या कमाईत २८% ची घट झाली आहे. sacnilk च्या अहवालानुसार, ‘गदर २’ ने गुरुवारी २३.२८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. अशाप्रकारे या चित्रपटाने ७ दिवसात २८४.६३ कोटींचा व्यवसाय केला आहे.

जगभरात एकूण ३६९ कोटी रुपयांचे संकलन

‘गदर २’ परदेशातही चांगली कामगिरी करत आहे. ७ दिवसांत या चित्रपटाने परदेशात ३३.१० कोटींची कमाई केली आहे. सनी देओलच्या चित्रपटाने भारतात २८४.६३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे, तर त्याचे एकूण ग्रॉस कलेक्शन ३३५.९० कोटी रुपये आहे. अशाप्रकारे ‘गदर २’ ने पहिल्या आठवड्यात देश-विदेशातील कमाईसह जगभरात ३६९ कोटी रुपयांचे कमाई केली आहे.

‘बाईपण भारी देवा’ १०० कोटी क्लबमध्ये दणक्यात घेणार एन्ट्री; यशामुळे भारावून गेले केदार शिंदे
शुक्रवारी ८ व्या दिवशी ३०० कोटी क्लबमध्ये प्रवेश निश्चित!

१९७१ च्या भारत-पाकिस्तानच्या वैमनस्यावर आधारित, ‘गदर २’ मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्यासह उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, मनीष वाधवा आणि गौरव चोप्रा देखील आहेत. यावेळी तारा सिंह आणि सकिना यांची कथा त्यांचा मुलगा जीतेला पाकिस्तानातून परत आणण्याची आहे. बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ ने पहिल्या दिवसापासून विक्रमी कमाई केली आहे. पहिल्या दिवशी ४०.१० कोटींची बंपर ओपनिंग घेणाऱ्या या चित्रपटाने १५ ऑगस्टला ५५.४० कोटींची कमाई केली. मात्र त्यानंतर आठवड्याच्या मध्ये चित्रपटाच्या कमाईत घसरण होऊ लागली. पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट ३०० कोटींची कमाई करेल असे वाटत होते. पण असे झाले नाही. मात्र, शुक्रवारी तो ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार हेही निश्चित आहे.

‘गदर २’ ने ७ दिवसांत बजेटपेक्षा ३ पट अधिक कमाई केली आहे

‘गदर २’चे बजेट ८० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. देशभरात ३२०० हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ७ दिवसांत आपल्या बजेटच्या ३ पटीने जास्त कमाई केली आहे. शाहरुख खानचा ‘पठाण’ आणि अदा शर्माच्या ‘द केरला स्टोरी’नंतर आता ‘गदर २’ हा २०२३ चा तिसरा ऑल-टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. गुरुवारी, पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देखील थिएटरमध्ये ३५.०६% प्रेक्षक होते. तर रात्रीच्या शोमध्ये ही संख्या ५३.०९% पर्यंत वाढली आहे.
OMG २ ने कोट्यवधी कमावले, अक्षयने घेतलं नाही मानधन; निर्मात्याने सांगितला खिलाडीचा दिलदारपणा
‘गदर २’ ‘पठाण’चा रेकॉर्ड मोडू शकेल का?

बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणार्‍या हिंदी चित्रपटाचा विक्रम शाहरुख खानच्या ‘पठाण’च्या नावावर आहे. या चित्रपटाने हिंदीतून ५२४.५३ कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले होते. हा विक्रम मोडण्याची क्षमता ‘गदर २’मध्ये असल्याचे जाणकारांचे मत आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रमही ‘पठाण’च्या नावावर आहे. शाहरुखच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली होती, त्यापैकी ५५ कोटी रुपये हिंदीतून जमा झाले होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.