Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अत्यंत कमी किंमतीत ८जीबी रॅम असलेला फोन; Motorola E13 चा नवा व्हेरिएंट बाजारात

36

मोटोरोलानं ह्यावर्षीच्या सुरुवातीला लाँच केलेल्या Motorola E13 ची ताकद वाढवली आहे. ह्या स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट बाजारात उपलब्ध होते, त्यात आता शक्तिशाली मॉडेलची भर पडली आहे. मोटोरोला ई१३ चा ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज असलेला तिसरा व्हेरिएंट लाँच झाला आहे. विशेष म्हणजे इतकी ताकद असून देखील ह्या मॉडेलची किंमत फक्त ८,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया ह्या स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन आणि सेल डेट.

Motorola E13 ८जीबी रॅम मॉडेलची किंमत

Moto E13 चा ८जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत ८,९९९ रुपयांपासून सुरु होते. ही लाँच ऑफर आहे जी काही दिवसांनी वाढू शकते. फोनची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून १६ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. आधीपासून बाजारात Moto E13 च्या २जीबी रॅम +६४जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 6,499 रुपये आणि ४जीबी रॅम +६४जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 7,299 रुपये आहे.

वाचा: Airtel 99 Rs Plan: कंपनीनं आणला जबरदस्त रिचार्ज; १०० रुपयांच्या आत ३० जीबी डेटा आणि अनेक फायदे

Motorola E13 चे स्पेसिफिकेशन्स

मोटोरोला ई१३ मध्ये युजर्सना ६.५ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात २०:९ अ‍ॅस्पेक्ट रेश्यो, ७२० x १६०० पिक्सल रिजोल्यूशन आणि ६० हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळतो. मोटो ई१३ चे डायमेंशन १६४.१९ x ७४.९५ x ८.४७एमएम आणि वजन १७९.५ ग्राम आहे.

हा डिवाइस २गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर Unisoc T606 प्रोसेसरवर चालतो. ह्यात ग्राफिक्ससाठी माली-जी५७ एमसी२ जीपीयू आहे. त्याचबरोबर ८जीबी पर्यंत रॅम आणि १२८जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते. फोनमधील मायक्रो एसडी कार्ड स्लॉटच्या मदतीनं १टीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येते.

वाचा: अरे वाह! फक्त 12 हजारांच्या आत १६जीबी रॅम; Tecno Pova 5 व Pova 5 Pro 5G ची भारतीय किंमत आली

फोटोग्राफीसाठी मोटोरोला ई१३ फोनच्या बॅक पॅनलवर १३ मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. डिवाइसमध्ये पावर बॅकअपसाठी ५,०००एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी १०वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा मोबाइल ४जी, वायफाय, ब्लूटूथ, आयपी५२ रेटिंग सारख्या अनेक फीचर्सना सपोर्ट करतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.