Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पीएम यशस्वी योजनेअंतर्गत, इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC), बिगर अधिसूचित, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती (DNT/NT/SNT) श्रेणीतील तब्बल १५ हजार गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने आखून दिलेल्या नियमांनुसार ७५,००० ते १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
इयत्ता ९ वी ते ११ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया (यशस्वी) सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा घेतली जाणार असून, या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी १.२५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी देशभरातून १५ हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
(वाचा : Tilak Mehta startup Success: मूर्ती लहान पण ‘तिलक मेहता’ची किर्ती महान, करिअरमध्ये मिळवलेय तुफान यश)
परीक्षेचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात असून, २९ सप्टेंबर ही परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
यशस्वी प्रवेश परीक्षा २०२३ महत्त्वाचे :
० पीएम यशस्वी योजनेअंतर्गत, इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC), बिगर अधिसूचित, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती (DNT/NT/SNT) श्रेणीतील तब्बल १५ हजार गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
० २ लाख ५० हजारांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांना या शिष्यवृत्तीचा फायदा घेता येणार नाही.
अशी पार पडणार प्रवेश प्रक्रिया :
- परीक्षा आयोजित करण्याची पद्धत : पेन अँड पेपर (OMR Based)
- या परीक्षेत १०० MCQ प्रश्न विचारले जाणार आहे.
- सदर परीक्षा २.३० तास (१५० मिनिटांची) असणार आहे
- ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत देता येणार आहे.
- २९ सप्टेंबर २०२३ रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
- या शिष्यवृत्तसाठी आणि परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या वियार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
- या शिष्यवृत्तसाठी आणि परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे.
PM Young Achievers Scholarship Scheme साठी अर्ज करण्यासाठी या अधिकृत लिंकवर क्लिक करा. (वाचा : Harshal Juikar Google Placement: IIT, IIM मधून नाही तर फक्त पुण्यातून BSC केलेल्या हर्षल जुईकरला Google मध्ये नोकरी)