Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जलसंपदा विभागात क आणि ड वर्गातील १६ हजार जागा रिकाम्याच, गेल्या दहा वर्षांपासून भरती नाही

7

WRD Recruitment 2023: राज्याच्या जलसंपदा विभागात २०१३ पासून गट क आणि ड वर्गातील विविध पदांच्या जागांसाठी पदभरती न झाल्यामुळे रिक्त पदांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी व राज्यात सिंचन क्षमता वाढवणाऱ्या या विभागाचा प्रश्नांकडे शासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले असून ही पदे लवकरात लवकर भरावीत असे निवेदन काही दिवसांपूर्वी देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गट ‘क’ वर्गाची सरळसेवा ८ हजार १४, पदोन्नती- ३१६३ अशी एकुण- १११७७ पदे रिक्त आहेत तर गट ‘ड’ वर्गाची सरळसेवा – ४७०२, तर पदोन्नतीने ३०६ एकूण ५००८ पदे ३१ मार्च २०२३ पर्यंत रिक्त होती. मात्र, ३१ मार्च २०२३ ते ३० जून २०२३ या कालावधीत या रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली आहे.

राज्यातील जलसंपदा विभाग हा पाणीपुरवठा व कृषी सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणाऱ्या कोकण विभागातही एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. कमी पावसाच्या मराठवाडा व विदर्भात तर अनेक ठिकाणी दरवर्षी दुष्काळसदृश परिस्थिती असते. असे असताना जलसंपदा विभागात सध्या गट क व ड वर्गात सध्या १६ हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. गेल्या दहा वर्षात ही भरती न झाल्यामुळे रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी कोकण विभाग कृषी पदवी व पदवीधारक संघर्ष समितीच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

गट ‘क’ आणि गट ‘ड’ वर्गातील रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

गट ‘क’ वर्गातील रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे :

1 प्रथम लिपिक : ५५ जागा
2 आरेखक : १४४ जागा
3 भांडारपाल : ६८ जागा
4 सहाय्यक आरेखक : १९१ जागा
5 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : २ हजार ५७१
6 वरिष्ठ लिपिक : ७०५ जागा
7 अनुरेखक : ९७६ जागा
8 संदेशक : १९० जागा
9 टंकलेखक : ५३ जागा
10 वाहनचालक : ८२४ जागा
11 कनिष्ट लिपिक : १ हजार ९६८ जागा
12 सहाय्यक भांडारपाल : १८१ जागा
13 दप्तरी कापकून : ५३४ जागा
14 मोजणीदार : ९५१ जागा
15 कालवा निरीक्षक : १ हजार ४७१

गट ‘ड’ वर्गातील रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे :

1 नाईक : २४५ जागा
2 शिपाई : २ हजार ३५७ जागा
3 चौकीदार : १ हजार ०५७ जागा
4 कालवा चौकीदार : ७८४ जागा
5 कालवा टपाली : ३३० जागा
6 प्रयोगशाळा परिचर : १५२ जागा
7 तप्तरी : ६ जागा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.