Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबईत करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ; पण ‘या’मुळे मिळाला मोठा दिलासा

19

मुंबई: मुंबई (Corona in Mumbai) महापालिका क्षेत्रात आज कालच्या तुलनेत करोनाच्या (Coronavirus) नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या बरोबरच आज मुत्यूंची संख्या देखील तुलनेने वाढली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ३३२ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या २८३ इतकी होती. तर, दिवसभरात २२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज अधिक आहे. काल ही संख्या २०३ इतकी होती. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ५ इतकी होती. यात दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील करोना वाढीचा दर ०.०३ टक्क्यांवर आली आहे. तर, रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून तो तब्बल २०५२ दिवसांवर पोहोचला आहे. ( mumbai registered 322 new cases in a day with 223 patients recovered and 6 deaths today)

याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख १९ हजार ३८१ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ९४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०३ टक्के इतका खाली आला आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता २ हजार ०५२ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.

क्लिक करा आणि वाचा- राज्याला आज दिलासा; करोनाचे दैनंदिन मृत्यू घटले, सक्रिय रुग्णांची संख्याही झाली कमी

मुंबईत आज ५६ हजार ५६६ चाचण्या

मुंबईत आज एकूण ५६ हजार ५६६ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये एकही सक्रिय कंटेनमेंट झोन नसून एकूण २४ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा- भाजप नेते किरीट सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक, शाईही फेकली

आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती

२४ तासांत बाधित रुग्ण – ३२२
२४ तासात बरे झालेले रुग्ण – २२३
बरे झालेले एकूण रुग्ण – ७१९३८१
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%

एकूण सक्रिय रुग्ण- २८५३
रुग्ण दुपटीचा कालावधी- २०५२ दिवस
कोविड वाढीचा दर (१३ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट)- ०.०३ %

क्लिक करा आणि वाचा- राहुल गांधींवर टीका करताना दानवेंची जीभ घसरली; आघाडीचे नेते भडकले

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.