Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आचार्य चाणक्य आपल्या बुद्धीमत्तेने आणि हुशारीने अवघ्या जगाला वाट दाखवणारी चाणक्य नीती सांगून गेले. त्यांचा प्रत्येक मंत्र लाख मोलाचा आहे. अगदी राजकारणापासून ते दैनंदिन आयुष्यात आपण कसे वागले पाहिजे याचा दाखला चाणक्य यांनी घालून दिला आहे. म्हणूनच आज ‘चाणक्य नीती’ ला बहुमोलाचे स्थान आहे. याच नीतीतील काही गोष्टी आज पाहूया जे तुमच्या करिअरला वेगळी दिशा देऊ शकतील.
आचार्य चाणक्य यांनी दिलेला यशाचा पहिला मंत्र हा शिक्षणाशी निगडित आहे. चाणक्य नीती नुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या शिक्षणाबाबत अत्यंत सजग आणि गंभीर असावे असे त्यांचे मत होते. शिक्षणाच्या मदतीने तुम्ही समाजात तुमचे वेगळे स्थान निर्माण शकता. ज्याला ज्ञान आहे त्याच्यासाठी जगातील कोणतेही काम अशक्य नाही. म्हणून शिक्षण घेताना कोणतीही हयगय करू नये असे चाणक्य सांगतात. कारण ज्याच्याकडे शिक्षण आहे, ज्याला त्या गोष्टीचे गांभीर्य आहे, त्याच्या हातात यश आहे.
(वाचा: Sub Inspector Recruitment 2023: कंबर कसा.. सब इन्स्पेक्टर पदासाठी सुरु झाली आहे महाभरती! असा करा अर्ज..)
आचार्य म्हणतात शिक्षणासोबत चातुर्यही गरजेचे आहे. आपल्याकडे शिक्षण असेल तर त्याचा वापर करून आपल्याला पुढे जाता यायला हवे. शिवाय व्यवहारी आणि चौकस असणेही गरजेचे आहे. जेणेकरून शिक्षणा सोबतच आपल्या चातुर्याने आपण आलेल्या परिस्थितीला योग्य पद्धतीने नियंत्रित करू शकतो. कारण जिथे बुद्धी, हुशारी असते तिथे देवी शारदेचा वास असतो आणि एकदा शारदा प्रसन्न झाली की लक्ष्मी प्रसन्न होतेच, असे चाणक्य सांगतात.
चाणक्य यांनी सांगितलेला तिसरा मंत्र म्हणजे शिस्त. तुमच्याकडे नुसते शिक्षण आणि हुशारी असून चालणार नाही, तर त्याला शिस्तीची जोड हवी. करिअर मध्ये काहीतरी ध्येय गाठायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला शिस्तबद्ध असणे आवश्यक आहे. तुम्ही शिस्त प्रिय व्यक्ती असाल तर तुम्हाला वेळेची चांगली किंमत कळते, त्या वेळेचा कसा उपयोग कारवा याची समज येते. एकदा आपल्या आयुष्यात आलेल्या वेळेचे महत्व समजले की कामाचे व्यवस्थापन, नियोजन या सगळ्यालाच शिस्त लागते. अशावेळी आळस, विचलितपणा तुमच्या जवळही येत नाही. त्यामुळे शिस्त करिअरच्या वाटेवर ही फार महत्वाची आहे. असे काही चाणक्य नीतीतील मोलाचे मंत्र आपले आयुष्य बदलू शकते.
(वाचा: Career Guidance: करिअर निवडण्यापूर्वी या सहा गोष्टी आवर्जून करा! कधीही पश्चाताप होणार नाही..)