Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हे लिंकिंग अँड्रॉइड वापरकर्त्यांना कॉल स्विचिंगसारख्या फीचर्सचा वापर करण्यासही मदत करेल. कॉल-स्विचिंग फीचर वापरकर्त्यांना कॉलसाठी लिंक केलेल्या डिव्हाइसेसमध्ये स्विच करण्याची परवानगी देते. हे अँड्रॉइड लिंकिंग फीचर वापरकर्त्यांना इंटरनेट शेअरिंगमध्येही मदत करू शकते.
Android चे नवीन फीचर कसे काम करेल?
एका रिपोर्टनुसार, अँड्रॉइड फोन्समध्ये सेटिंग मेनूमध्ये Link Your Devices नावाचा एक नवीन पर्याय असेल. गुगल प्ले सर्व्हिसेसच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे. हे फीचर लवकरच Google Play Store अॅपसह Android डिव्हाइसवर आणले जाऊ शकते. तसंच Google चं हे नवीन फीचर Apple ID प्रमाणे काम करेल. ज्या प्रकारे अॅपल आयडीशी सर्व अॅपल प्रोडक्ट कनेक्ट केली जातात, त्याच प्रकारे हे फीचर आपल्या सर्व Android डिव्हाइसेसला एकत्र जोडेल. रिपोर्टनुसार, Google ने सुचवले आहे की कॉल कंटिन्युटी फीचर इतर अँड्रॉईड फोनवरही उपलब्ध करून द्यावे.
Apple आणणार नवीन अपडेट
एकीकडे अँन्ड्रॉईड Apple प्रमामे फीचर आणत असून Apple लवकरच iOS 17 अपडेट लाँच करू शकते. या अपडेटमुळे अॅपल डिव्हाईसमध्ये आणखी नवीन फीचर येणार आहेत. नवीन फीचर्ससह आयफोनचा लुक पूर्णपणे बदलतील. iOS 17 अपडेट अंतर्गत, आयफोनमध्ये दिलेले एंड कॉल बटण बदलले जाऊ शकते. यामुळे आता तळाशी जे कॉल कट करण्याटे बटण आहे, ते स्थान बदलून दुसऱ्या ठिकाणी केले जाईल.
वाचा : तुमचाही Smartphone सारखा तापतोय? या सवयी सोडा, नाहीतर पूर्णच खराब होईल फोन