Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड कॅमेरा फोनची ताकद वाढणार; Vivo X100 Pro+ मध्ये मिळू शकतो २००एमपीचा कॅमेरा

8

विवोची एक्स सीरिजच्या कॅमेरा क्वॉलिटीचे कौतुक सामान्य युजर्ससह समीक्षकही करतात. फक्त कॅमेराचा नव्हे तर इतर स्पेसिफिकेशन्स दर्जेदार असतात. आता लवकरच कंपनी ह्या सीरिजचा विस्तार करत X100 लाइनअप लाँच करू शकते, ज्यात Vivo X100, X100 Pro आणि X100 Pro+ चा समावेश असू शकतो. सध्या कंपनीनं कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही परंतु टॉप व्हेरिएंट Vivo X100 Pro+ ची माहिती समोर आली आहे.

Vivo X100 Pro+ चे लीक स्पेसिफिकेशन्स

चिनी मायक्रो ब्लॉगिंग साईट विबोवर विवो एक्स१०० प्रो+ चे मुख्य स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. ह्यात स्मार्टफोनच्या डिस्प्ले, प्रोसेसर, स्टोरेज, कॅमेरा आणि सिक्योरिटी फीचर्सचा समावेश आहे. फक्त आगामी विवो फोनमधील बॅटरीची माहिती ह्या लीकमधून समोर आली नाही.

वाचा: Smartphone Tips : स्मार्टफोनही स्लो चालतोय? फास्ट करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

विवोचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ६.७८-इंचाच्या डिस्प्लेसह येऊ शकतो. त्याचबरोबर ह्या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेटची ताकद दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे क्वॉलकॉमच्या ह्या आगामी प्रोसेसरची अद्याप घोषणाही झालेली नाही. त्याचबरोबर डिवाइसमध्ये १६जीबी किंवा २४जीबी एलपीडीडीआर५ रॅम + १ टीबी पर्यंत यूएफएस ४.० स्टोरेज दिली जाऊ शकतो.

विवोच्या एक्स सीरिजमध्ये सर्वाधिक लक्ष कॅमेरा सेगमेंटकडे जातं. लीकनुसार आगामी विवो एक्स१०० प्रो प्लसमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यात व्हेरिएबल अपर्चर असलेला ५०-मेगापिक्सलची Sony IMX989 प्रायमरी लेन्स मिळू शकते. त्याचबरोबर ५०मेगापिक्सलची IMX598 अल्ट्रा-वाइड लेन्स, ५०-मेगापिक्सलची IMX758 पोर्ट्रेट लेन्स आणि सर्वात खास २००-मेगापिक्सलची टेलीफोटो कॅमेरा लेन्स दिली जाऊ शकते. सेल्फी कॅमेऱ्याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही.

वाचा: ठरलं तर! सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या बॅक पॅनलसह होणार Vivo V29e ची एंट्री; लाँच डेट आली

आगामी Vivo X100 Pro+ स्मार्टफोन आयपी६८ रेटिंगसह लाँच केला जाऊ शकतो. त्यामुळे फोन काही प्रमाणात पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहू शकतो. इतकंच नव्हे तर हा फोन अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येऊ शकतो. Vivo X100 Series लाँच बद्दल सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु दरवर्षी कंपनीच्या एक्स सीरिज वर्षाच्या अखेरपर्यंत सर्वप्रथम चीनमध्ये सादर केली जाते. त्यानंतर ही सीरिज भारतासह जगभरात लाँच केली जाण्याची शक्यता आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.