Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अबब! 440MP चा कॅमेरा! Samsung फोन्समध्ये मिळू शकतो सर्वात जास्त रिजोल्यूशन असलेला कॅमेरा

8

Samsung पुन्हा एकदा मोबाइल कॅमेरा क्षेत्रात क्रांती घडवण्याची तयारी करत आहे. ६४एमपीपासून १०८एमपी त्यानंतर २००मेगापिक्सलचा कॅमेरा असलेले स्मार्टफोन लाँच केल्यानंतर दक्षिण कोरियन कंपनी आता 440MP च्या कॅमेरा सेन्सरवर काम करत आहे. सॅमसंगनं यंदा लाँच झालेल्या Galaxy S23 Ultra मध्ये २००मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला आहे. ह्यात कंपनीनं HP2 सेन्सरचा वापर केला आहे. सॅमसंग आता आपल्या ISOCELL सेन्सरच्या नवीन जेनरेशनवर काम करत आहे. रिपोर्टनुसार हा सेन्सर बाजारात येण्यासाठी अपेक्षेपेक्षा कमी वेळ घेईल. कदाचित पुढील वर्षीच आपल्याला ३००मेगापिक्सल ते ४४०मेगापिक्सल पर्यंतचा कॅमेरा असलेला फोन बाजारात दिसू शकतो.

440MP Camera Sensor

Revegnus नावाच्या एका टिपस्टरनं आपल्या सोशल मीडिया (X) हँडलवरून दावा केला आहे की सॅमसंग ४४०मेगापिक्सलच्या एचयू१ सेन्सरवर काम करत आहे. तसेच कंपनी ३२०मेगापिक्सल आणि २००मेगापिक्सलच्या एचपी७ सेन्सर देखील डिजाइन करत आहे. हा सेन्सर ०.७ मायक्रोन पिक्सलचे फोटो क्लिक करू शकतो. सॅमसंग बजेट फोनसाठी नवीन ५०मेगापिक्सलचा जीएन६ सेन्सर देखील बनवत आहे, जो १.६ मायक्रोन पिक्सलला सपोर्ट करेल. सॅमसंगची ही कॅमेरा टेक्नॉलॉजी येत्या काही दिवसांत अनेक स्मार्टफोन्समध्ये दिसू शकते.

वाचा: सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड कॅमेरा फोनची ताकद वाढणार; Vivo X100 Pro+ मध्ये मिळू शकतो २००एमपीचा कॅमेरा

असं म्हणतात मानवी डोळ्याचं रिजोल्यूशन ५००मेगापिक्सल ते ६००मेगापिक्सल दरम्यान असतं. सॅमसंगचा हा कॅमेरा सेन्सर मानवी डोळ्याच्या क्षमतेच्या अजून जवळ पोहोचेल, त्यामुळे स्मार्टफोनमधून घेतलेल्या फोटोमधून सर्वकाही स्पष्ट कॅप्चर होण्याची शक्यात आहे. दक्षिण कोरियन कंपनीनं २०२० मध्ये असा दावा केला होता की ते अशा कॅमेरा सेन्सरवर काम करत आहे. तेव्हा असं देखील सांगण्यात आलं होतं की सॅमसंगचा हा कॅमेरा सेन्सर ऑटोमोटिव्ह आणि इंडस्ट्रीयल सेक्टरसाठी बनवला जात आहे.

वाचा: ठरलं तर! सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या बॅक पॅनलसह होणार Vivo V29e ची एंट्री; लाँच डेट आली

Galaxy S26Ultra मध्ये मिळू शकतो हा सेन्सर

MediaTek नं अलीकडेच लाँच केलेल्या Dimensity 9200 मध्ये ३२० मेगापिक्सलच्या कॅमेरा सिस्टमला सपोर्ट करू शकतो. सॅमसंग येत्या काही वर्षात म्हणजे आपल्या Galaxy S26 Ultra फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये ३२०मेगापिक्सलच्या कॅमेरा सेन्सरचा वापर करू शकते. सॅमसंगनं २००मेगापिक्सल एचपी१ सेन्सर यंदा लाँच झालेल्या Galaxy S23 Ultra 5G मध्ये वापर केला आहे. तसेच, ५०मेगापिक्सल जीएन६ कॅमेरा सेन्सर Sony च्या आयएमएक्स९८९ कॅमेरा सेन्सरला टक्कर देण्यासाठी डिजाइन केला आहे. हा एक १ इंचाचा कॅमेरा सेन्सर आहे, जो पुढील वर्षी येणाऱ्या अनेक मिड बजेट स्मार्टफोनमध्ये वापरला जाऊ शकतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.