Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एयर इंडियामध्ये विमान तंत्रज्ञ (देखभाल / इंजिन शॉप), विमान तंत्रज्ञ (देखभाल), तंत्रज्ञ (वेल्डर), तंत्रज्ञ (मशिनिस्ट) या पदांच्या रिक्त जागा भरण्याची ही प्रक्रिया सुरु आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करता येणार आहेत. सदर भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
(वाचा : AAI Recruitment 2023: भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरती, ४ सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज)
पदभरतीचा तपशील :
एकूण रिक्त जागा : ५७
रिक्त जागांचा तपशील
- विमान तंत्रज्ञ (B1 (देखभाल / इंजिन शॉप) / Aircraft Technician (B1 Maintenance, & Engine Shop) : ४५ जागा
- विमान तंत्रज्ञ (B1 देखभाल) / Aircraft Technician (B2 Maintenance) : १० जागा
- टेक्निशियन / Technician (Machinist – COD) : १ जागा
- टेक्निशियन / Technician (Welder – COD) : १ जागा
नोकरीचे ठिकाण : नागपूर
महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ ऑगस्ट २०२३
शैक्षणिक पात्रता :
- विमान तंत्रज्ञ – AME डिप्लोमा/एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअरिंगचे प्रमाणपत्र
- विमान तंत्रज्ञ (देखभाल) – AME डिप्लोमा/एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगचे प्रमाणपत्र
- तंत्रज्ञ (वेल्डर) – केंद्र/राज्य सरकार किंवा NCVT द्वारे मान्यताप्राप्त, वेल्डर ट्रेडमध्ये ITI सह १०+२ पास (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह)
- तंत्रज्ञ (मशिनिस्ट) – केंद्र/राज्य सरकार किंवा NCVT द्वारे मान्यताप्राप्त मशीनिस्ट ट्रेडमध्ये ITI सह १०+२ उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह)
(वाचा : HPCL Recruitment 2023: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ‘या’ पदांच्या २७६ जागांसाठी भरती सुरु, काय आहे अर्जाची शेवटची तारीख)
अर्ज शुल्काविषयी :
खुला प्रवर्ग आणि ओबीसी : १००० रुपये.
SC/ST/माजी सैनिक उमेदवार : ५०० रुपये.
मुलाखतीचे संभाव्य वेळापत्रक :
सदर भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवाराला १ सप्टेंबर २०२३ नंतर मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
मुलाखतीचा पत्ता :
प्लॉट नंबर १, सेक्टर ९, नोटीफाईड एरिया ऑफ एसईझेड, खापरी मेट्रो आणि रेल्वे स्टेशन जवळ, नागपूर, महाराष्ट्र ४४१ १०८
AIESL Nagpur Bharti 2023 मूळ जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
AIESL Nagpur Bharti 2023 मधील जागांसाठी गुगल फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
AIESL Nagpur Bharti 2023 मधील जागांसाठी वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : NTPC Recruitment: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये इंजिनियर्सना कामाची संधी; २ लाखांहून अधिक पगार देणाऱ्या ‘या’ पदांसाठी भरती)