Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दहावीपास ते पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी; आजच करा अर्ज

8

MECL Recruitment 2023: मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड (एमईसीएल) महाराष्ट्र मध्ये विविध पदांकरिता भरती प्रक्रिया सुरु आहे. एमसीईएलकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून, मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड मधील ९४ रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत. ४० एक्स्ल्युझिव्ह पदे आणि ५४ नॉन-एक्स्ल्युझिव्ह पदे अशा ९४ पदांचा यात समावेश असून याकरिता वयोमर्यादा २१ ते ४२ वर्षे आहे.

एमईसीएल मधील रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ सप्टेंबर २०२३ असून विविध पदांसाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता ही बॅचलर किंवा पदव्युत्तर पदवी आहे. पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारदेखील या पदांसाठी अर्ज करु शकतात. तसेच, या पदांसाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना २० हजार ते ५५ हजारांपर्यंत निश्चित वेतन देण्यात येणार आहे.

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MECL) पदभरतीचा तपशील :

एकूण रिक्त जागा : ९४

अकाउंटंट
हिंदी ट्रान्सलेटर
टेक्निशिअन (सर्वे आणि ड्राफ्ट्समन)
टेक्निशिअन (सॅम्पलिंग)
टेक्निशिअन (लॅब्रॉटरी)
असिस्टंट (मटेरिअल्स)
असिस्टंट (अकॉउंटस)
असिस्टंट (HR)
असिस्टंट (हिंदी)
इलेकट्रीशियन

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत किंवा परदेशात.

(वाचा : AIESL Recruitment 2023: टाटा समुहाच्या ‘एअर इंडिया’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्जाची पद्धत आणि पात्रता निकष)

पदनिहाय शैक्षणिक पात्रता :

  • अकाउंटंट : पदवी/ पदव्युत्तर पदवीसह CA/ ICWA + ३ वर्षांचा अनुभव.
  • हिंदी ट्रान्सलेटर : हिंदी आणि इंग्रजी विषयासह पदवी + हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी + ३ वर्षांचा अनुभव.
  • टेक्निशिअन (सर्वे आणि ड्राफ्ट्समन) : १० वी पास + सर्वे/ ड्राफ्ट्समन सिव्हिल विषयात ITI + वर्षांचा अनुभव.
  • टेक्निशिअन (सॅम्पलिंग) : विज्ञान शाखेतील पदवी (B.Sc) + वर्षांचा अनुभव.
  • टेक्निशिअन (लॅब्रॉटरी) : केमिस्ट्री/ फिजिक्स/ जिऑलॉजि विषयात पदवी (B.Sc) +वर्षांचा अनुभव.
  • असिस्टंट (मटेरिअल्स) : गणित विषयात पदवी किंवा वाणिज्य शाखेतील पदवी (B.Com) + इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. + वर्षांचा अनुभव.
  • असिस्टंट (अकॉउंटस) : वाणिज्य शाखेतील पदवी (B.Com) + वर्षांचा अनुभव.
  • असिस्टंट (HR) : कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. +वर्षांचा अनुभव.
  • असिस्टंट (हिंदी) : हिंदी आणि इंग्रजी विषयासह पदवी किंवा इंग्रजी विषयात पदवी + अॅडव्हान्स हिंदीमध्ये समकक्ष परीक्षा उत्तीर्ण + हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. + वर्षांचा अनुभव.
  • इलेक्ट्रिशिअन : १० वी पास + इलेक्ट्रिकल विषयात ITI + वायरमन प्रमाणपत्र + वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा :

  • खुला प्रवर्ग (General Category) : १८ ते ३० वर्षे.
  • मागासवर्गीय (Schedule Cast) : ५ वर्षांची सूट.
  • ओबीसी (OBC) : ३ वर्षांची सूट.

(वाचा : HPCL Recruitment 2023: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ‘या’ पदांच्या २७६ जागांसाठी भरती सुरु)

अर्ज शुल्क :

खुला/ ओबीसी/ EWS : १०० रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD : फी नाही.

महत्वाच्या तारखा:

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात : १४ ऑगस्ट २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ सप्टेंबर २०२३

अशी पार पडणार निवड प्रक्रिया :

  1. निवड प्रक्रियेमध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  2. निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित अनुभव असलेल्या उमेदवाराना प्राधान्य दिले जाईल.
  3. योग्य कौशल्य, त्यानंतर लेखी चाचणी, कौशल्य चाचणी/व्यापार चाचणी पार पडेल.
  4. विशिष्‍ट पदासाठी किंवा नोकरीची आवश्‍यकता विचारात घेऊन या चाचण्या पार पडतील.
  5. भरतीच्या सर्व संबंधित चाचण्या नागपूर शहरातच होतील.

महत्त्वाचे :

  • उपरोक्त जागांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी केवळ MECL च्या वेबसाइटच्या ऑनलाइन रिक्रूटमेंट पोर्टलद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे.
  • संबंधित लिंक “CAREER→Advertisement Notices” या शीर्षकाखाली उपलब्ध आहे.
  • MECL वेबसाइट : https://www.mecl.co.in/Careers.aspx किंवा meclrecruitment.co.in.
  • इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

पदभरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.MECL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. MECL Recruitment 2023 मधील जागांच्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा .

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.