Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महाराष्ट्र राज्य तलाठी भरती परीक्षेत यंत्रणा फेल; बिघडलेल्या सर्व्हरमुळे बिघडले परीक्षेचे वेळापत्रक

10

Maharashtra Talathi Bharti Exam 2023 Server Down News: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत तलाठी पदभरतीची घोषणा करण्यात आली असून, या पदभरतीसाठी आवश्यक परीक्षेला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विविध विद्युत उपकरणांच्या मदतीने ऑनलाइन तलाठी परीक्षेचा पेपर फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला. आज, २१ ऑगस्ट २०२३ रोजी परीक्षेच्या पाचव्याच दिवशी ऑनलाइन परीक्षेदरम्यान, विद्यार्थ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. परीक्षा सुरू होण्याआधीच सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना वाट पाहायला लागली . राज्यातील नागपूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर या केंद्रांवर सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता.

(फोटो : प्रातिनिधिक)

महाराष्ट्र शासनाच्या जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा (Computer Based Test) घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तलाठी भरती परीक्षेसाठी TCS कंपनीच्यावतीने तारखा निश्चित करण्यात आल्या. या भरतीसाठी आवश्यक असणारी परीक्षा १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत १९ दिवस असून, ही परीक्षा ३ सत्रांमध्ये घेतली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

(वाचा : MECL Recruitment 2023: दहावीपास, पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; एमईसीएलमध्ये ९४ जागांसाठी भरती)

तब्बल १९ दिवस प्रतिदिनी ३ सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडणार असल्याचे वेळापत्रकात नमूद करण्यात आले होते. या परीक्षेत आज पहिल्या सत्रातील परीक्षेसाठी परीक्षार्थी लाखो विद्यार्थी वेळेच्या आधी परीक्षा केंद्रांवर पोहोचले होते. परीक्षेची वेळ झाल्यानंतरही परीक्षार्थींना केंद्राबाहेर बाहेरच थांबवण्यात आले. यामुळे केंद्राबाहेर विद्यार्थ्याची मोठी गर्दी झाली होती. शिवाय, वर्गात प्रवेश दिला जात नसल्याचे कारण विचारलेल्या परीक्षार्थींना उडवाउडवीची उत्तरे दिले जात होते. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते.

ही परीक्षा सकाळी ९ ते ११ या वेळेत होती. मात्र, ९ वाजून गेले तरी परीक्षा सुरू होऊ शकली नव्हती. दरम्यान, सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने परीक्षा खोळंबली असल्याचे कारण पुढे आले. परीक्षेपूर्वी झालेल्या या गोंधळाचा त्रास परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. ठरलेल्या वेळापत्रकाच्या वेळानुसार तब्बल दीड तास उशिराने या परीक्षेला सुरुवात झाली. त्यामुळे बिघडलेल्या सर्व्हरमुळे आजच्या दिवसातील उर्वरित दोन सत्राचे वेळापत्रकही बिघडणार असल्याचे बोलले जात आहे.

महसूल विभागाकडून तलाठी पदाच्या ४ हजार ६४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या जागांसाठी राज्यातून १० लाख ४१ हजार इच्छुकांनी अर्ज केले आहे.

परीक्षेच्या नियोजित तारखा खालील प्रमाणे :

१७ ऑगस्ट २०२३ ते २२ ऑगस्ट २०२३
२६ ऑगस्ट २०२३ ते २९ ऑगस्ट २०२३
३१ ऑगस्ट २०२३ आणि १ सप्टेंबर २०२३
४ सप्टेंबर २०२३ ते ६ सप्टेंबर २०२३
८ सप्टेंबर २०२३ आणि १० सप्टेंबर २०२३
१३ सप्टेंबर २०२३ आणि १४ सप्टेंबर २०२३

(वरील सर्व तारखांना सत्राची वेळ)
सत्र १ : सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ : दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ : सायंकाळी ४.३० ते ६.३०

(वाचा : AIESL Recruitment 2023: टाटा समुहाच्या ‘एअर इंडिया’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्जाची पद्धत आणि पात्रता निकष)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.