Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१२ हजारांच्या बजेटमध्ये ५२००एमएएचची दमदार बॅटरी; स्वस्त Honor Play 40S मध्ये ५जी कनेक्टिव्हिटी

21

मोबाइल निर्माता ऑनर आगामी सप्टेंबर महिन्यात भारतीय बाजारात पुनरागमन करणार आहे. तसेच होम मार्केटमध्ये देखील एकापाठोपाठ एक स्मार्टफोन सादर करत आहे. आता ब्रँडनं प्ले ४० सीरीज अंतगर्त Honor Play 40S बाजारात आणला आहे. कंपनीनं ह्या स्मार्टफोनची किंमत सामन्यांना परवडेल अशी ठेवली आहे. तरीही ह्यात ५२००एमएएचची बॅटरी, स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, ६.५६ इंचाचा डिस्प्ले असे फिचर मिळतात. चला जाणून घेऊया ह्याची किंमत आणि स्पेसिफिकेशन.

Honor Play 40S ची किंमत

Honor Play 40S स्मार्टफोन कंपनीनं ४जीबी रॅमसह लाँच केला आहे, जोडीला १२८जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. चीनमध्ये सादर करण्यात आलेल्या ह्या डिवाइसची किंमत ९९९ चायनीज युआन ठेवण्यात आली आहे, ही किंमत सुमारे ११,३०० भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. फोन मिडनाइट ब्लॅक आणि ग्रीन अशा दोन रंगात सादर करण्यात आला आहे. ऑनर प्ले ४०एस भारतात येईल की नाही आणि आलाच तर त्याची किंमत एवढीच असेल का ते आता पाहावं लागेल.

वाचा: ऑनलाईन पाहता येणार चंद्रयान ३ चं लाइव्ह लँडिंग, तीन प्लॅटफॉर्म्सवर थेट प्रक्षेपण

Honor Play 40S चे स्पेसिफिकेशन्स

ऑनर प्ले ४०एस मध्ये कंपनीनं ६.५६ इंचाचा टीएफटी एलसीडी डिस्प्ले दिला आहे. जो ७२० x १६१२ पिक्सल रिजॉल्यूशन आणि ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. ह्या हँडसेटचे डायमेन्शन १६३.३२×७५.०७x ८.३५ एमएम आणि वजन १८८ ग्राम आहे.

डिवाइसमध्ये युजर्सना क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४८० प्लस प्रोसेसर मिळतो. हा एक ५जी चिपसेट आहे. जोडीला ४जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसमध्ये सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचं रिजोल्यूशन १३ मेगापिक्सल आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचा: अबब! 440MP चा कॅमेरा! Samsung फोन्समध्ये मिळू शकतो सर्वात जास्त रिजोल्यूशन असलेला कॅमेरा

डिवाइसमध्ये ५२००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी मोबाइलमध्ये ५जी, ४जी, वायफाय, ब्लूटूथ ५.१, जीपीएस, टाइप सी पोर्ट आणि ३.५एमएम हेडफोन जॅक सारखे फीचर्स आहेत. त्याचबरोबर ग्रॅव्हिटी सेन्सर, कंपास, अ‍ॅम्बिएंट लाइट सेन्सर, प्रॉक्सिमिटी लाइट सेन्सर मिळतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.