Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
GeM साईटचे संपूर्ण नाव म्हणाल तर गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस आहे. पण या रिपोर्टमध्ये आम्ही सांगत असलेल्या लॅपटॉपची खरेदी ही केवळ सरकारी नोकरी करणाऱ्यांनाच करता येणार आहे. तर या GeM साइटचा अधिकृत दावा आहे की Acer itel Core i5 लॅपटॉपची मूळ किंमत १,१८,००० रुपये आहे. ज्यावर ९० टक्के डिस्काउंट देऊन केवळ ११ हजार रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या डीलमध्ये कोणतंही अधिकचं छुपं शुल्क लावलं गेलेलं नसून तसंच कोणतीही बँक किंवा इतर सवलत ऑफर दिली गेली नाही. या साईटवरुन ग्राहक ११,८०० रुपये भरून थेट लॅपटॉप घरी आणू शकतील. हा लॅपटॉप एसरच्या वेबसाइटवर ५६,९९० रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा Acer लॅपटॉपचा मर्यादित साठा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. केवळ ३५ लॅपटॉपच शिल्लक असल्याचं साईटचं म्हणणं आहे.
या लॅपटॉपचे फीचर्स काय?
फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, Acer लॅपटॉप itel Core i5 प्रोसेसरसह येतो. हे Windows 11 होमला सपोर्ट करते. लॅपटॉपमध्ये 8 जीबी रॅम आहे. तर स्टोरेजसाठी 512 GB सपोर्ट आहे. लॅपटॉपच्या स्क्रीनचा आकार १४ इंच आहे. याचे डिस्प्ले रेझोल्यूशन 1920/1080 पिक्सेल आहे. लॅपटॉपच्या खरेदीवर ३ वर्षांची वॉरंटी आणि ३ वर्षांची ऑन साईट वॉरंटी दिली जात आहे. लॅपटॉपचे वजन १.६ किलो आहे. आहे. यामध्ये फिंगरप्रिंट रीडरचा सपोर्टही देण्यात आला आहे.
टीप – GeM पोर्टलवरून फक्त सरकारी अधिकारी उत्पादने खरेदी करू शकतात.
वाचा : आता चष्म्याद्वारे फोनवरही बोलता येणार, ब्लूटूथ कॉलिंगसह टायटन आय प्लसनं लाँच केले Smart Glasses