Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१०वी पास आणि आटीआय उमेदवारांसाठी भारतीय नौदलात सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी करा अर्ज..

9

नेव्हीमध्ये म्हणजेच भारतीय नौदलात काम करण्याची अनेकांना इच्छा असते. अनेकजण या भरतीची आतुरतेने वाट पाहत असतात. आता दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय केलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदलात नोकरीची संधी चालून आली आहे. भारतीय नौदल ( Indian Navy HQ ANC) हेड क्वार्टर अंदमान आणि निकोबार कमांड अंतर्गत ट्रेड्समन मेट पदांसाठी भरती केली जाणार आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे. या भरती अंतर्गत एकूण ३६२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये उमेदवार दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. शिवाय भारतभरात कुठेही नोकरी करण्याची त्याची तयारी हवी. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज कसा करायचा ते पाहूया..

भारतीय नौदलाच्या या ३६२ पदांमध्ये आयआयटीच्या विविध ट्रेड साठी जागा रिक्त आहेत, त्याचे तपशील अर्जात दिलेले आहेत. अद्याप या भरतीचे अर्ज उपलब्ध झालेले नाहीत, परंतु येत्या २६ ऑगस्ट २०२३ पासून तुम्ही ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२३ आहे तर अर्ज करण्यासाठी अंदमान निकोबार शासनाच्या या https://www.andaman.gov.in/ अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. भरतीचे सर्व तपशील https://drive.google.com/file/d/1UZdnAY9xNr1wP0gPh2I3PXLZUqD4xQaD/view या लिंकवर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. या अर्जप्रक्रियेतून पात्र उमेदवारांची १०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा ही प्रत्यक्ष स्वरूपात होणार असून त्याचे अपशिल वरील लिंक मध्ये दिलेले आहेत. त्यातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड केली जाईल.

(वाचा: CBSE Exam News: सीबीएसईचा विद्यार्थ्यांना इशारा! विषय नोंदवताना चुक झाल्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही..)

नोकरी ठिकाण : अंदमान आणि निकोबार आणि संपूर्ण भारत.

शैक्षणिक पात्रता : १० वी पास किंवा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय.

वयोमर्यादा:

  • खुला प्रवर्ग : कमीत कमी १८ ते जास्तीतजास्त२५ वर्षे.
  • ओबीसी प्रवर्ग : वरील वयोमर्यादेत कमाल वयात ३ वर्षांची सूट.
  • मागासवर्गीय : वरील वयोमर्यादित कमाल वयात ५ वर्षांची सूट.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जात भरलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळ्यास त्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. शिवाय, चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्रे वापरणाऱ्या उमेदवारांचे अर्ज निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर फेटाळण्यात येतील अशी सूचना इंडियन नेव्हीच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

(वाचा: Top Acting Institute: अॅक्टर व्हायचंय? मग भारतातील ‘या’ टॉप इन्स्टिट्यूट विषयी नक्की जाणून घ्या..)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.