Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
काय घडलं नेमकं?
विशाखापट्टणम येथील चांदणी नावाच्या महिलेनं ५ फेब्रुवारी २०२२ रोजी दाबा गार्डन भागातील कंपनीच्या रिटेलर सेल पॉईंटकडून iPhone 12 चा ६४जीबी व्हेरिएंट खरेदी केला होता. रिटेलरनं नवा फोन देण्याऐवजी महिलेला डेमो फोन दिला, जो ५ महिन्यात खराब झाला. फोन खराब झाल्यावर महिलेनं सेल पॉईंटवर डिवाइस रिपेयर करण्यासाठी नेला तेव्हा स्टोरनं सांगितलं की हा एक डेमो फोन होता. त्यानंतर महिलेनं अॅप्पल केयरकडे फोनची तक्रार केली तेव्हा समजलं की ह्या फोनची वॉरंटी १३ नोव्हेंबर २०२२ संपली होती, त्यामुळे हा रिपेयरिंग वॉरंटीमध्ये येत नाही.
वाचा: १२ हजारांच्या बजेटमध्ये ५२००एमएएचची दमदार बॅटरी; स्वस्त Honor Play 40S मध्ये ५जी कनेक्टिव्हिटीundefined
महिलेनं आपल्या तक्रारीत सांगितलं की रिटेलर किंवा कंपनीनं ही समस्या सोडवण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्यानंतर महिलेनं डिस्प्यूट रिड्रेसल कमीशनकडे तक्रार केली. आयोगानं महिलेच्या बाजूनं निकाल देत अॅप्पल इंडिया आणि रिटेलरला दंड ठोठावला आहे. तसेच फोनची किंमत रिफंड करण्याचे आदेश दिले आहेत. जर तुम्ही देखील नवीन iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर डिवाइस ब्रँड न्यू आहे की डेमो आहे किंवा रिफर्बिश्ड म्हणजे वापरलेला फोन आहे हे पुढील पद्धत वापरून चेक करता येईल.
असा ओळख अस्सल iPhone
पहिली पद्धत
- iPhone रिटेल बॉक्सवरील सीरियल नंबरच्या माध्यमातून व्हॅलिडेट करता येतो.
- जर तुम्हाला सीरियल नंबर मिळत नसेल तर iPhone च्या IMEI नंबरवरून देखील सीरियल नंबर मिळवता येईल.
- ह्यासाठी तुमच्या iPhone डायलरमध्ये जाऊन *#06# कोड डायल करा आणि IMEI नंबर नोट करा.
- त्यानंतर Apple Support च्या वेबसाइट (https://checkcoverage.apple.com/) वर जा आणि IMEI नंबर टाकून परचेज व्हॅलिडेट करा.
वाचा: वर्षभर चालणारा Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन; रोज मिळणार २.५जीबी डेटा आणि Disney Hotstar चं सब्सस्क्रिप्शन
दुसरी पद्धत
- तुमच्या iPhone च्या सेटिंग्समध्ये जा आणि General किंवा About वर टॅप करा.
- इथे तुम्हाला मॉडेल नंबर, सीरियल नंबर, IMEI नंबरसह डिवाइसची सर्व माहिती मिळेल.
- About सेक्शनमध्ये मॉडेल आइटेंडिफायर टेक्स्ट दिला जातो जो “MN572LL/A” पासून सुरु होतो.
- जर ह्या टेक्स्टची सुरुवात M अल्फाबेटपासून होत असेल तर त्याचा अर्थ असा की तुम्ही एक ओरिजीनल डिवाइस खरेदी केला आहे.
- जर टेक्स्टची सुरुवात F पासून होत असेल तर हा एक रिफर्बिश्ड आयफोन आहे.
- N पासून सुरु होणारे डिवाइस रिप्लेसमेंट डिवाइस असतात.
- P अक्षर पर्सनलाइज्ड आयफोनसाठी वापरलं जातं.
- iPhone चा मॉडेल नंबर इतर कोणत्याही अल्फाबेटपासून सुरु होत असेल तर तो डेमो किंवा डुप्लीकेट डिवाइस असू शकतो.