Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तुमचा गेट (GATE) परीक्षेचा निकाल तुम्हाला मिळवून देऊ शकतो सरकारी नोकरी; रेल्वेमधील या पदांसाठी करा अर्ज

10

Northern Railway Recruitment 2023 Registration: उत्तर रेल्वेने सिनिअर टेक्निकल असोसिएट पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. सदर भरतीची नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २८ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे. भरतीशी संबंधित महत्त्वाचे तपशील जाणून घ्या.

पदभरतीचा तपशील :

एकूण रिक्त जागा : ९३

  • एसटीए (सिव्हिल) : ६०पदे
  • एसटीए(इलेक्ट्रिकल) : २० पदे
  • एसटीए (सिग्नल आणि टेलिकॉम) : १३ पदे

या उमेदवारांना नोकरीची संधी :

० उत्तर रेल्वेने सिनिअर टेक्निकल असोसिएट पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराने सिव्हिल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग किंवा सिग्नल आणि टेलिकॉममध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण (Bachelor’s Degree) पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
० या जागांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराकडे गेट परीक्षा (Gate) उत्तीर्ण असणे आवशयक आहे. (२०१९ ते २०२३ या कालावधीत परीक्षा देऊन गेट उत्तीर्ण झालेले वियार्थी)
० सदर पदांसाठी वयोमर्यादा २० ते ३४ वर्षे असून, आरक्षित वर्गाला वयाच्या बाबतीत सवलत देण्यात आली आहे
(पात्रता, आरक्षण आणि इतर महत्त्वाचा तपशील जाणून घेण्यासाठी मूळ जाहीरात पाहा.)

(वाचा : MSRTC Recruitment 2023: एसटी महामंडळामध्ये वर्ग अ, ब व संवर्ग ब संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती !)

अर्जाविषयी महत्त्वाचे :

उत्तर रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी देऊन सीनिअर टेक्निकल असोसिएट आणि इतर संबंधित पदांसाठी अर्ज करू शकता.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने मूळ जाहीरातीमधील सगळे नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचून, त्यानंतर अर्ज करावा.

अशी पार पडेल निवड प्रक्रिया :

या जागांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांच्या नियमांनुसार कागदपत्राची पूर्तता व पडताळणी आणि GATE स्कोअरच्या आधारे निवडले जाईल.निवड केली जाणार आहे.

अर्जाच्या फी विषयी :

  1. या जागांसाठी अर्ज करताना उमेदवाराने १०० रुपये भरणे अनिवार्य असून, हे शुल्क विना परतावा तत्वावर घेतले जाईल.
  2. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचा भाग म्हणून हे शुल्क गेटवेद्वारे ऑनलाइन पेमेंट पद्धतीने करावे लागेल
  3. अर्जाचा तपशील अचूक असल्याची खात्री केल्यानंतर, उमेदवार ऑनलाइन अर्जासह एकत्रित केलेल्या पेमेंटद्वारे देय देणे आवश्यक आहे.
  4. एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारला त्यात कोणात्यहई प्रकारचे बादल करता येणार नाहीत.
  5. अर्ज शुल्क भरण्यासाठी उमेदवारला डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग इत्यादी सुविधांचा वापर करता येणार आहे.
  6. परीक्षा शुल्क भरल्यानंतर व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर, ई-पावतीची प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवा.
  7. SC/ST/महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

NORTHERN RAILWAY मधील पदभरतीची मूळ जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

NORTHERN RAILWAY च्या अधिकृत वेबसाइटल भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा : MECL Recruitment 2023: दहावीपास, पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; एमईसीएलमध्ये ९४ जागांसाठी भरती)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.