Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Towed Bike With Rider: पुण्यात वाहतूक पोलिसांनी बाइकस्वारासह उचलली बाइक!; आता म्हणतात…

17

हायलाइट्स:

  • बाइकवर बसलेल्या व्यक्तीसह टोईंग वाहनाने बाइक उचलली.
  • पुणे वाहतूक पोलिसांच्या कारवाईवरून उठलं मोठं वादळ.
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलिसाची बदली.

पुणे: पुण्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक व्यक्ती बाइकवर बसलेली असताना वाहतूक पोलिसांनी कारवाई करत त्याच्यासकट बाइक क्रेनने उचलल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून ही कारवाई करणारा कॉन्स्टेबल राजेंद्र चलवादी याची बदली करण्यात आली आहे तर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ( Pune Traffic Police Towed Bike With Rider )

वाचा:दुचाकीच्या नंबरप्लेटवर चिखल लावून घरफोडया करणारे निघाले सख्खे भाऊ

पुणे शहरातील नाना पेठ भागात हा प्रकार घडला. वाहतूक पोलिसांच्या टोईंग वाहनाने बाइकचालक बाइकवर बसलेला असतानाच कारवाई केल्याने सगळेच हादरले. तिथे बघ्यांचीही गर्दी झाली. काहींनी मोबाइलमध्ये हा प्रकार टिपला. गुरुवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ आज सर्वत्र व्हायरल झाला असून पोलिसांना तातडीने त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

बाइकचालकाने विनंती केली पण…

माझी बाइक नो पार्किंगमध्ये उभी नव्हती. मी केवळ दोन मिनिटांसाठी रस्त्याच्या कडेला उभा राहिलो होतो. मी आता येथून निघतोय, असे सांगत बाइकस्वाराने पोलिसाला कारवाई करू नका अशी विनंती केली मात्र, ही विनंती संबंधित पोलिसाने मान्य केली नाही. त्यांच्या सूचनेनुसार बाइक क्रेनच्या साह्याने उचलण्यात आली. बाइकस्वार बाइकवर बसून राहिला असतानाही ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई करताना नियम पाळले न गेल्यानेच संबंधित पोलीस अडचणीत सापडला आहे.

वाचा:चांगली बातमी! १२ वर्षांवरील मुलांसाठी करोनावरील लसीला केंद्राची मंजुरी

हे सगळं अचानक घडलं पण…

पुणे वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. हा सारा प्रकार अचानकपणे घडलेला आहे. असं असलं तरी कारवाई करताना खबरदारी बाळगणं आवश्यक असतं. बाइक ताब्यात घेण्याआधी बाइकस्वाराला खाली उतरवायला हवं होतं, असे ते म्हणाले. सदर बाइक नो पार्किंगमध्ये उभी होती. ही बाइक उचलत असताना संबंधित तरुण धावत येऊन बाइकवर बसला. त्याला खाली उतरण्यास सांगण्यात आलं पण प्रथम त्याने ऐकलं नाही. नंतर त्याने आपली चूक मान्य केली आणि दंडही भरला आहे, असे श्रीरामे यांनी पुढे नमूद केले.

Pune News : वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगमधील दुचाकी चालकासह उचलली

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.