Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

३५ हजारांच्या बजेटमध्ये जबरदस्त लॅपटॉप; १६जीबी रॅम, आणि १४ इंचाच्या डिस्प्लेसह Infinix INBook X3 Slim लाँच

10

इनफिनिक्स इनबुक एक्स३ स्लिम लॅपटॉप आज भारतात लाँच झाला आहे. कंपनीचा हा नवा लॅपटॉप १४ इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह येतो ज्यात फुलएचडी रिजोल्यूशन मिळतं. हा लॅपटॉप तीन प्रोसेसर व्हेरिएंटसह आला आहे. इनफिनिक्स इनबुक एक्स३ स्लिम मध्ये १६जीबी पर्यंत रॅम आणि ५१२जीबी एसएसडी स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच ह्यात अल्युमिनियम अलॉय फिनिश, ७२०पिक्सल एचडी वेबकॅम, ५०डब्लूएच बॅटरी आणि ३.५एमएम हेडफोन जॅक देखील आहे. चला जाणून घेऊया स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.

Infinix INBook X3 Slim ची किंमत

इनफिनिक्स इनबुक एक्स३ स्लिम रेड, ग्रीन, ग्रे आणि ब्लू कलरमध्ये विकत घेता येईल. लॅपटॉपचा कोर आय३ प्रोसेसर मॉडेल ८जीबी रॅम आणि ५१२जीबी स्टोरेज असलेला मॉडेल ३३,९९० रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर कोर आय५ मॉडेल १६जीबी रॅम आणि ५१२जीबी स्टोरेजसह ३९,४९० रुपयांमध्ये बाजारात आला आहे. तर टॉप व्हेरिएंटमध्ये १६जीबी रॅम व ५१२जीबी स्टोरेजसह कोर आय७ प्रोसेसर मिळतो, ज्याची किंमत ४९,९९० रुपये ठेवण्यात आली आहे.

हा लॅपटॉप २५ ऑगस्टपासून फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. लाँच ऑफर अंतर्गत अतिरिक्त बँक डिस्काउंट आणि ९५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळेल.

वाचा: Gmail Translate Feature: भलामोठा इंग्रजी ई-मेल आता चुटकीसरशी दिसणार मराठीत; डिक्शनरी शोधण्याची गरज नाही

Infinix INBook X3 Slim चे स्पेसिफिकेशन्स

नव्या इनफिनिक्स इनबुक एक्स३ स्लिममध्ये अल्युमिनियम अलॉय फिनिश देण्यात आली आहे. ह्याची जाडी १४.८मिमी आहे तर वजन १.२४ किलोग्रॅम आहे. ह्या लॅपटॉपला 12th Gen Intel Core i7 (1255U) प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे, जोडीला Iris Xe ग्राफिक्ससाठी आहे. तसेच लॅपटॉपमध्ये १६जीबी पर्यंत एलपीडीडीआर४एक्स आणि ५१२जीबी एनव्हीएमइ पीसीआयई ३.० एसएसडी स्टोरेज देण्यात आली आहे. लॅपटॉप विंडोज १० होम एडिशनवर चालतो. तसेच ह्यात १४.१ इंचाचा डिस्प्ले फुलएचडी रिजोल्यूशन आणि ३००निट्झ ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

वाचा: तुम्हीही फोन कव्हरमध्ये नोट ठेवता? जीवघेणी ठरू शकते ही छोटीशी सवय, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

तसेच लॅपटॉपमध्ये ७२०पी एचडी वेबकॅम, ३.५एमएम हेडफोन जॅक, स्टिरियो स्पिकर्स आणि दोन डिजिटल मायक्रोफोन आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय ६ ८०२.११ एएक्स, ब्लूटूथ ५.१, यूएसबी सी पोर्ट, एक एचडीएमआय १.४ पोर्ट, दोन यूएसबी ३.० पोर्ट आणि एक एसडी कार्ड स्लॉट आहे. ह्या लॅपटॉपला पावर देण्यासाठी ५०वॉटअव्हरची बॅटरी देण्यात आली आहे जी ६५वॉट पीडी ३.० टाइप सी फास्ट चार्जरच्या मदतीनं चार्ज करता येते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.